लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धा मुळा, अर्धी वाटी भिजवलेली हरभरा डाळ, २ टे स्पून दही, ३-४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, फोडणीसाठी- १ टे स्पून तेल, हिंग, हळद, मोहरी.
क्रमवार पाककृती:
मुळा किसुन घ्यावा. ह. डाळ, मिरच्या एकत्र जरा भरड वाटुन घ्यावे. हिंग/हळद/मोहोरीची फोडणी करावी. मुळ्यातले पाणी घट्ट पिळुन त्यात वाटलेली डाळ, दही, फोडणी, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन नीट मिसळुन घ्यावे. आवडत असल्यास चिमुटभर साखर घालावी. आमटी/भात किंवा पोळी बरोबर खावे 
वाढणी/प्रमाण:
चार मोठे (इतर भाज्या/आमट्या जेवणात असतील तर)
अधिक टिपा:
_दही आवडत नसल्यास लिंबाचा रस घालावा.
_मुळ्याच्या कोशिंबीरीच्या इतर कृती इथे आहेत.
माहितीचा स्रोत:
आई



मस्तय, नक्की करुन पाहिन
मस्त. करुन पाहणार.
तृप्ती,
फोडणीत किस घालावा की किसात फोडणी ओतावी तेवढे सांग. कृती छान आणि त्याबद्दल धन्यवाद.
सिंडी मस्तच आहे,ही कृती ,
माझी पण एक कृती,
घट्ट दह्यात, मुळ्याचा किस,दाण्याच कुट्,चवीप्रमाणे मीठ साखर घालुन ठेवाव, दोन मिरचा गॅस वर भाजुन नंतर मिठ लाऊन चुरडुन टाकाव्यात, तुपाची जिर घालुन फोडणी (हळद,तिखट न घालता )घालायची वरन आणि मस्त पैकी मिक्स करायच , नंतर कोथींबीर घालायची, भाजुन चुरडलेल्या मिरची चा स्वाद मस्त लागतो, फोडणी ऑप्शनल आहे, घातली नाही तरी छान लागतो चटका.
लै झ्याक! करते आता लगेच.
मस्त
स्मिता, कुंभमेळा.
आश्वे
खरच ग खरच !!
तरी कोकणातल्या घरी आजी चुलीवर मिरच्या भाजायची तो स्वाद अजुन आठवतोय