लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धा मुळा, अर्धी वाटी भिजवलेली हरभरा डाळ, २ टे स्पून दही, ३-४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, फोडणीसाठी- १ टे स्पून तेल, हिंग, हळद, मोहरी.
क्रमवार पाककृती:
मुळा किसुन घ्यावा. ह. डाळ, मिरच्या एकत्र जरा भरड वाटुन घ्यावे. हिंग/हळद/मोहोरीची फोडणी करावी. मुळ्यातले पाणी घट्ट पिळुन त्यात वाटलेली डाळ, दही, फोडणी, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन नीट मिसळुन घ्यावे. आवडत असल्यास चिमुटभर साखर घालावी. आमटी/भात किंवा पोळी बरोबर खावे 
वाढणी/प्रमाण:
चार मोठे (इतर भाज्या/आमट्या जेवणात असतील तर)
अधिक टिपा:
_दही आवडत नसल्यास लिंबाचा रस घालावा.
_मुळ्याच्या कोशिंबीरीच्या इतर कृती इथे आहेत.
माहितीचा स्रोत:
आई

