१) धणे, जिर, मेथी, तिळ, दालचिनी वेगवेगळे भाजून घ्या. भांड्यात थोडे तेल टाकुन त्यावर कढीपत्ता खरपुस तळून घ्या.
२) सगळे एकत्र करुन तयार झालेले मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करा.
३) पालकला उकळी आलेल्या पाण्यातून काढून त्यात मिरच्या घालून पालकची पेस्ट बनवा.
४) भांड्यात बटर घालून त्यावर कांदा बदामी रंगाचा होई पर्यंत शिजवा.
५) कांद्यावर आल-लसुण पेस्ट टाकून परतवा.
६) ह्यात आता हिंग, हळद घालून पालकची पेस्ट, चणाडाळ आणि काजू घालून बेताचे पाणी घालून शिजू द्या.
७) चणाडाळ शिजली की त्यावर लिंबाचा रस, मिक्सरमधून काढलेला (धणे,तिळ, जिर, दालचीनी, मेथ्या, कढीपत्ता) सुका मसाला व मिठ घालून चांगले ढवळा व एक उकळी येउ द्या. झाले बटर पालक तय्यार. अजून चव येण्यासाठी सर्व करताना थोडा बटर ह्या पालकच्या ग्रेव्हीवर वाढायचा.
ह्यात अर्धा चमचा साखर घातली तरी वेगळी चव येईल.
मसाल्यांचे, मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
यम्मी!
यम्मी!
छानच, आणि हो जागु
छानच,
आणि हो जागु ताई,
तुम्हाला अनेक पालेभाज्या माहिति आतिलच तर त्या कश्या शिजवाव्या आनि कश्या कराव्या ते पण लिहा ना. जसे पालकाचे अनेक प्रकार मेथि अनेक प्रकारे माठ, चवळि, हरभरयाचा पला वैगरे - वैगरे
आपल्या पाककृतिचि वाट पाहणारि
भाग्यश्री
जागू हिरवागार पालक छान
जागू हिरवागार पालक छान दिसतोय!
सुरेख दिसत्येय भाजी !
सुरेख दिसत्येय भाजी !
मस्तच दिसत आहे भाजी...रंग
मस्तच दिसत आहे भाजी...रंग एकदम टिकलाय!!
सकाळपासुन मी ते बालक पालक असे वाचत होते..मला वाटले अजुन एक रिव्यु आलाय..आता ग्रुप चे नाव वाचल्यावर कळल पाक्रु आहे ते
वाँव सहीच
वाँव सहीच
अर्र... कुठलेच प्राणी दिसत
अर्र... कुठलेच प्राणी दिसत नाहीत ह्यात ! अश्या 'सात्त्विक' रेसिप्या शोभत नाहीत तुमच्या बाफांवर..
अर्र... कुठलेच प्राणी दिसत
अर्र... कुठलेच प्राणी दिसत नाहीत ह्यात ! अश्या 'सात्त्विक' रेसिप्या शोभत नाहीत तुमच्या बाफांवर..>>>+++११११
मासे पहायचि सवय झालि आहे आम्हाला...........
चला जागू आज फॉर अ चेंज पालक?
चला जागू आज फॉर अ चेंज पालक?
ह्यात अर्धा चमचा साखर घातली तरी वेगळी चव येईल. >> फक्त अर्धा चमचा का?
मला मूळात पालक आवडत नाही त्यामुळे...
मसाल्यांचे, मिरच्यांचे प्रमाण >> मी मसाल्यांचे ऐवजी माश्यांचे वाचलं चुकून..
जागूताई, सध्या दिवस "बालक
जागूताई,
सध्या दिवस "बालक पालक"चे आहेत..... त्यात हा "बटर पालक" जरा वेगळा वाटला
जागुले रेस्पी पण मस्त आणि
जागुले रेस्पी पण मस्त आणि फोटो तर क्लासच!
छान प्रकार !
छान प्रकार !
मला पण बालक पालकचचं परिक्षण
मला पण बालक पालकचचं परिक्षण वाटलं आधी
डिश जाम यम्मी वाटतेय .
पालकाची ग्रेव्ही गरम मसाला
पालकाची ग्रेव्ही गरम मसाला घालून पंजाबी पद्धतीनेच माहीत होती. ही वेगळी आहे. नक्की करुन बघणार
चिन्नू, अंशा, रावी, मृनिष,
चिन्नू, अंशा, रावी, मृनिष, जाई, भुंगा, मानुषी, दिनेशदा, श्री, अगो धन्यवाद.
भाग्यश्री वेळ मिळाल्यावर नक्की लिहेन.
पराग, सृष्टी, दक्षिणा
खुप मस्त आहे
खुप मस्त आहे
जागु ताई, मस्तच रेशिपी गो. मी
जागु ताई, मस्तच रेशिपी गो.
मी आज केली होती, तर " पालक मला आवडत नाही व मी जन्मात कधी पालक खाणार नाही," आणि बटाट्याच्या भाजीशिवाय दुसरी भाजी आवडीने न खाणार्या माझ्या भावी नवरोबाने नुसत्या वासानेच मला वाढ , पालक असला तरी चालेल असे म्हणत मिटक्या मारुन खाल्ली चक्क
धन्यु गो.
यम्मी दिसतेय....
यम्मी दिसतेय....
प्रितमोहर अग असे प्रकार मला
प्रितमोहर अग असे प्रकार मला मुलीसाठी करावे लागतात. ती पण नुसत्या पालेभाज्या खात नाही. मग कधी कटलेटमध्ये, पराठे, पावभाजी, थालीपीठ, पुलाव मध्ये काही प्रमाणात भाज्या घालून देते. तू पण असे प्रयोग कर.
अखी धन्स.
जागु,नेहमीपेक्षा वेगळा
जागु,नेहमीपेक्षा वेगळा पालक-प्रकार..चणाडाळ बरोबर पालकाची ची चव छानच लागेल.
जागू, टेस्टि प्रकार आहे. करून
जागू, टेस्टि प्रकार आहे. करून बघायला पाहिजे.