अल्पना यांचे रंगीबेरंगी पान

Luwan of Brida - सारंग महाजन

सारंग महाजन हा माझ्या धाकट्या भावाचा मित्र. त्याच्या हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ रिंग्ज प्रेमामूळे आमचं बरं जमायचं. हॅपॉ सिरीजमधलं पुस्तक बाजारात आलं की याच्या हातात आणि नंतर एक-दोन दिवसात त्याच्याकडून माझ्या हातात यायचं. माझ्या लग्नाची इ पत्रिका याने मला बनवून दिली होती.

भावाबरोबर बीएससी करून नंतर एमबीए ( ??) झालेला हा पोरगा. नोकरीच्या भानगडीत न पडता याने वेब पेज डिझायनींग सुरु केलं. सारंग काय करतोय याचं उत्तर दर काही दिवसांनी बदलायचं. वेब पेज डिझायनींग /मेन्टेनंस चालू होतंच. सोबत जीम, फोटोग्राफी, भटकंती, वाचन, लिखाणही चालू होतं.

ऑटो एक्स्पो २०१२

काल गाड्यांच्या कुंभ मेळ्याला भेट देवून आलो. ऑटो एक्स्पो बघण्याची ही माझी तिसरी वेळ. गेल्या दोनही वेळेस ऑटो एक्स्पो संपताना शेवटच्या काही दिवसात बघितला होता. यावेळी मात्र भावाने पहिल्या दोन दिवसातच बघा, नंतर गर्दी वाढेल असं सांगून ठेवलं होतं. पहिल्या दिवशी बरेचसे सेलिब्रटीज असणार म्हणून आम्ही दुसर्‍या दिवशी बघायचं ठरवलं होतं.

ख्रिसमस एल्फ

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीपण शाळेतून फॅन्सी ड्रेसची नोट आली होती. गेल्या वर्षीच्या अनुभवामूळे यावेळी मी स्वतःच जरा आधी काय काय बनवता येईल याची कल्पना घेतली होती. शाळेतली एक महत्वाची अट नाताळाच्या संदर्भातलीच वेशभुषा असावी अशी होती.

एल्फ, सँटा, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस बेल असे काही पर्याय मुलाला दिले आणि नेटवर त्यांची चित्रं दाखवली तर त्याने आधी मला रावण बनायचंय असं सांगितलं. अ ओ, आता काय करायचं मग सँटा आणि सर्वात शेवटी एल्फ बनूंगा असं उत्तर मिळालं. (वर्गात दरवर्षी बरेच सॅन्टाक्लॉज येत असतात म्हणून एल्फच बन हे मला खूप वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगावं लागलं. )

आमचा एंजल

५-६ दिवसांपूर्वी लेकाच्या शाळेतून डायरीवर नोट आली, २४ तारखेला मुलांना सांताक्लॉज, एंजल, फेयरी यापैकी एका वेशभुषेमध्ये पाठवावे.
तर आज एंजलच्या वेशभुषेत आयाम शाळेत गेला होता. त्यासगळ्याची ही कृती.

सर्वात आधी २२ तारखेला पुपुवर चर्चा सुरु केली. बरेच वेगवेगळे सल्ले मिळाले. त्यातला रैनाने सुचवलेला रिसायकल कपड्यातून सरळ सोप्पा सांताक्लॉज बनवण्याचा पर्याय सगळ्यात सोप्पा वाटला. तरीही त्याकडे दूर्लक्ष केलं. नीरजा, प्राची आनि इतरांनी एंजल बनण्यासाठी काय काय साहित्य लागेल हे सांगितल्यावर घरात असलेल्या साहित्य शोधून ठेवलं. नसणार्‍या वस्तूंसाठी पर्यायी काय वापरता येईल याचा अंदाज घेतला.

लवासा संबंधित चर्चेच्या निमित्ताने

शैलजाने लिहिलेले 'लवासा' या निळू दामलेंच्या पुस्तकाचे केलेले परिक्षण वाचूनच मला खरंतर या प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर निळू दामलेंचाच 'कालनिर्णय' मधिल लेखही वाचला. याप्रकल्पाबद्दल आधी काहीच माहिती नसल्याने माझी काही परिचितांशी याबाबत चर्चा सुरु झाली. त्यांच्याकडून जनआयोगाचा चौकशी अहवाल वाचायला मिळाला. (हे सगळं मागच्या २ दिवसात झालं). हे वाचन चालू असतानाच अनेक पर्यटन विकास आराखड्यांच्या प्रकल्पावर काम केलेल्या एका मित्राशी पण बोलत होते. त्याच्या बोलण्यामधून आणि वाचत असलेल्या काही बातम्यांमधून माझ्या लवासाबद्दलच्या शंका मिटण्यापेक्षा आणखी कुतुहल वाढले.

आज्जीच्या कविता -२

ही अजून एक कविता बाईंनी लिहिलेली. मी लहान असल्यापासून त्यांच्या तोंडी ऐकतेय ही कविता. छान चालीत गातात त्या. स्मित

नको नको हा वेणीचा गाडा
बरा हा तो सैल अंबाडा
अरे अरे देश बुडाला
स्त्रियांचा शिनगार पुढे आला

खोवती कंबरी आकडा
पिन खोवती केसाला
नको नको इरकलचे लुगडे
पांढरे पातळ, खडी काढा त्याला
अरे अरे देश बुडाला
स्त्रियांचा शिनगार पुढे आला

हातात बांगडी एक
घड्याळाची टिक टिक
तिच्या चालण्याचा झोक
बरेच पहातात सभेचे लोक
कोण्या हिंदुची सुन
कपाळी कुंकवाची खुण
हिंदु माझे बंधु, पांगळे नका राहु
बिगी बिगी चाला
अरे अरे देश बुडाला
स्त्रियांचा शिनगार पुढे आला

आज्जीच्या कविता -१

खूप दिवसांपासून लिहायचं होतं, माझ्या आज्जीबद्दल- बाईंबद्दल.

बाई- माझ्या वडिलांची आई. घरात सगळेच त्यांना बाई म्हणतात. त्यांच नाव तोळाबाई खंदारे. वय ८४ च्या आसपास. अशिक्षित, मराठवाड्यातल्या एका खेड्यात, मराठ्यांच्या घरात उभा जन्म गेला त्यांचा. अतिशय देवभोळ्या आणि साध्या सरळ स्वभावाच्या. खरंतर सगळ्यांना घाबरुनच रहाणार्‍या. महिन्यातले १५-२० दिवस कोणता ना कोणता उपास करत असतात, या वयातही.

आमच्या कन्हैय्या !!

उद्याच्या जन्माष्टमीनिमित्त आज लेकाच्या शाळेत सगळ्या मुला-मुलींना कृष्ण अन राधेच्या वेषभुषेत यायला सांगितले होते.

काल संध्याकाळीच कळाल्यामूळे कपडे बाजारात जावून घाईघाईने आणले. बाकीची आभूषणे मात्र घरीच बनवली. पत्रिकेच्या कागदाचा मुकुट (त्यावर जुन्या ड्रेस अन ओढणीवरच्या टिकल्या आणि कुंदन), त्यच पत्रिकेचे बाजुबंद, गुंडाळी फळ्याच्या तुटलेल्या पाइपला सजवून त्याची बासरी, जुन्या चपलांना सोनेरी कागद लावून चमचमवणे असा सगळा लवाजमा तयार केला होता.

हे त्याचे फोटो. स्मित

IMG_1974.JPG

मराठी कविता संग्रह पाठवा

माझ्या एका परिचिताने अंबेजोगाईत हा उपक्रम सुरु केला आहे. मायबोलीकरांना याबाबत माहिती द्यावी म्हणून इथे लिहित आहे.
याबद्दल लोकसत्तेमध्ये आलेली बातमी http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=536...

मराठी कविता संग्रह पाठवा-

अंबेजोगाई ही आद्यकवी मुकुंदराजांची भूमी.
येथेच त्यांनी रचला मराठी कवितेचा पहिला ग्रंथ विवेक सिंधु .
त्यानंतर मराठी कवितेचा अखंड प्रवाह सुरु आहे .
या साडे आठशे वर्षात मराठी कवितेचे रूपांतर एका महानदीत झाले आहे.

ग्लास पेंटिंग्ज

मागे डॅफोला विचारुन ती करते त्या प्रकारचे ग्लास पेंटींग्ज करायला घेतले होते. पण ते अर्धवटच पडून राहिलय.

आईकडे आलेच आहे तर पूर्वी मी ऑइल कलर्स वापरुन केलेल्या ग्लास पेंटींग्जचे काही फोटो काढलेत.
अर्थात ही सगळी चित्र कोणत्याना कोणत्या चित्राची कॉपी आहेत. यात ओरिजनल असं काही नाहीये..

IMG_1583.JPG

हे अजून एक भुभुचे चित्र.. सध्या माझ्या लेकाचं अत्यंत आवडीचं. स्मित

IMG_1602.JPG

अन हे माझं आवडतं...