कविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट ३

कायापालट स्पर्धा "वारी..." प्रवेशिका ३ : महागाईग्रस्त मध्यमवर्गाचा अभंग - kavita.navare

Submitted by संयोजक on 1 September, 2009 - 13:59

प्रवेशिका ३ : महागाईग्रस्त मध्यमवर्गाचा अभंग

मूळ कविता : वारी चुकलेल्या वारकर्‍याचा अभंग

महागाईचा ह्या | उच्चांक रे झाला ||
फाटका हा झाला | खीसा माझा ||

भाजी घेऊ जाता | होतो बहु ताप ||
खाऊ काय काप? | बटाट्याचे ||

हापुसचा आंबा | चित्रात बघतो ||
प्रत्यक्षात खातो | चीकु केळे ||

स्वप्न बघतो मी | मिळे मला धन ||
मिळता ते धन | घेऊ न्यानो ||

गरिब जरी मी | लाचार हा नाही ||
कष्टालाही नाही | घाबरत ||

कायापालट स्पर्धा "वारी..." प्रवेशिका २ : कोटा चुकलेल्या पिंटकाचा आक्रोश - tanyabedekar

Submitted by संयोजक on 31 August, 2009 - 22:15

प्रवेशिका २ : कोटा चुकलेल्या पिंटकाचा आक्रोश

मूळ कविता : वारी चुकलेल्या वारकर्‍याचा अभंग

मज पिंटकासी | ड्रायडेचा भोग |
बाटलीचा योग | नाही आज ||

ड्रायडेच्या आधी | केला नाही स्टॉक |
आता पश्चात्ताप | वृथा होइ ||

भेटला बेवडा | सभोवती दर्प |
झाला मज हर्ष | स्वर्गाप्रती ||

विचारोनी त्याला | कुठे मिळे माल |
पळालो भरभर | गुत्त्याकडे ||

काळ्या बाजारात | किंमत ती फार |
सोसवेना भार | खिशावरी ||

लोक होती पुढे | पाहतो मी हताश |
बाटली खिशात | घालून जाती ||

केला निश्चयाचा | महामेरु थोर |

कायापालट स्पर्धा "वारी..." प्रवेशिका १ : वारी चुकलेल्या पुढार्‍याचा अभंग - mriganayanee

Submitted by संयोजक on 29 August, 2009 - 23:13

प्रवेशिका १ : वारी चुकलेल्या पुढार्‍याचा अभंग

मूळ कविता : वारी चुकलेल्या वारकर्‍याचा अभंग

मज लापटाने़। केले बहु पाप।
टिकीटाचा योग। नाही आता॥

सत्तेविना मज। आला बहू ताप।
जनू हिवताप। ठावे देवा॥

झालो देवदास। वागने लोचट।
मदिरेचा घोट। फक्त आता॥

हा कोनता शाप। मना मधे दिल्ली।
नशिबात गल्ली। पापा पाई॥

मज डोई वरी। करजाचा भार।
बँकेचे लेटर। येई आता॥

कर मला माफ। वागलो लंपट।
जगण्याचा विट। आला आता॥

Subscribe to RSS - कविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट ३