कायापालट स्पर्धा "वारी..." प्रवेशिका ३ : महागाईग्रस्त मध्यमवर्गाचा अभंग - kavita.navare

Submitted by संयोजक on 1 September, 2009 - 13:59

प्रवेशिका ३ : महागाईग्रस्त मध्यमवर्गाचा अभंग

मूळ कविता : वारी चुकलेल्या वारकर्‍याचा अभंग

महागाईचा ह्या | उच्चांक रे झाला ||
फाटका हा झाला | खीसा माझा ||

भाजी घेऊ जाता | होतो बहु ताप ||
खाऊ काय काप? | बटाट्याचे ||

हापुसचा आंबा | चित्रात बघतो ||
प्रत्यक्षात खातो | चीकु केळे ||

स्वप्न बघतो मी | मिळे मला धन ||
मिळता ते धन | घेऊ न्यानो ||

गरिब जरी मी | लाचार हा नाही ||
कष्टालाही नाही | घाबरत ||

एकवेळ ऐसी | चालेल गरिबी ||
नको रे गरिबी | वैचारिक ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users