अर्नाळा

बेटावरी किल्ला.. जंजिरे अर्नाळा !

Submitted by Yo.Rocks on 2 February, 2016 - 11:10

किल्ले अर्नाळा म्हणजे खरं तर अर्नाळा नावाच्या छोटया बेटावर बांधलेला जलदुर्ग.. जंजिरे अर्नाळा ! मुंबई पासून जवळ विरार पश्चिमेला.. जिथे वैतरणा नदी अरबी समुद्राला मिळते त्याच भागात असलेले हे अर्नाळा बेट… आतापर्यंत अर्नाळा या कुतूहलाने दोन-तीन वेळा बोलावून घेतलेले पण माझी चाल समुद्रकिनाऱ्यापर्यंत स्मितीत राहिलेली.. त्यात दोन वेळा तर बोटीत चढण्यासाठी कमरेपर्यंतच्या पाण्यात शिरणे आवश्यक असल्याने भानगडीत पडलो नव्हतो.. हो या बेटावर जाण्यासाठी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरून बोट असते.. पण हालत अशी की त्या बेटावर वस्ती आहे व तरीही तिथे ये-जा करणाऱ्या लोकांसाठी किनाऱ्यावर साधी जेट्टीची सोय नाही..

किल्ले अर्नाळा

Submitted by इंद्रधनुष्य on 23 May, 2012 - 02:14

महाराष्ट्र दिनाची सुट्टी कशी सत्कारणी लावायची या विचारात असताना 'योरॉक्स'चा समस आला. विरारचा जलदुर्ग 'अर्नाळा' करण्याचा बेत होता. मस्त 'बुजिंग ट्रेक'चा प्लॅन ठरला. रामप्रहरी संयोजक टांगांरू असल्याची वर्दी समस मधुन मिळाली... पण मोहिम रद्द न करता गिरिविहारच्या रथातून आगाशीच्या दिशेने निघालो.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अर्नाळा