किल्ले अर्नाळा

Submitted by इंद्रधनुष्य on 23 May, 2012 - 02:14

महाराष्ट्र दिनाची सुट्टी कशी सत्कारणी लावायची या विचारात असताना 'योरॉक्स'चा समस आला. विरारचा जलदुर्ग 'अर्नाळा' करण्याचा बेत होता. मस्त 'बुजिंग ट्रेक'चा प्लॅन ठरला. रामप्रहरी संयोजक टांगांरू असल्याची वर्दी समस मधुन मिळाली... पण मोहिम रद्द न करता गिरिविहारच्या रथातून आगाशीच्या दिशेने निघालो.

नाष्ट्याला गरमा गरम बुजिंग फस्त केले. साडे नऊच्या सुमारास अर्नाळ्याच्या किनार्‍यावर पोहचलो.

पैलतीरावर नारळीच्या झाडां मागे किल्ला दडलेला होता. डावीकडे गोल बुरुज आणि उजविकडे नविनच बांधलेले मंदिर दिसत होते. फेरी बोटीतून पाच मिनिटांत आम्ही किनार्‍याला लागलो.

वैतरणा खाडी जिथे अरबी समुद्राला मिळते अश्या मोक्याच्या ठिकाणी सन १५१६ मधे 'सुलतान महमूद बेगडा' याने टेहळणी साठी या किल्ल्याचे बांधकाम केले. या किल्ल्यावर पोर्तुगीज आणि पेशव्यांनी त्यांच्या सत्तेच्या काळात विविध बांधकामे केली.

महादरवाजा

चौकोनी आकाराचा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. गडाचे तट उंच आणि रुंद असून ते अजूनही मजबूत स्थीतीत आहेत... स्थानिक कोळी बांधव त्या रुंद तटांचा उपयोग मासळी सुकविण्यासाठी करतात.

तटबंदीत बरेच बुरुज आहेत... आणि त्यावरून खाली उतरण्यासाठी जिन्यांची सोय देखिल आहे.

दक्षिणेकडील तटबंदीतील जंग्याची रचना विशिष्ठ प्रकारे केलेली आहे. साधारणपणे जंग्या ९० किंवा ४५ शंकाच्या कोनात असतात. इथे मात्र एकाच दगडात जुळ्या आणि तिळ्या जंग्या बघावयास मिळाल्या. दक्षिणेकडील सपाटीवरुन हल्ला झालाच तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून अश्या प्रकारच्या जंग्याची रचना केलेली असावी.

मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डावीकडे त्रंबकेश्वराचे मंदिर दिसते. मंदिरा समोर अष्टकोनी तळे आहे.

प्रवेशद्वाराच्या वर घुमटा सारखा उंचवटा आहे. त्यावरून सभोवतालचे निरिक्षण करता येते.

एक दिड तासांत किल्ला फिरून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मिसला Sad
रामप्रहरी संयोजक टांगांरू असल्याची वर्दी समस मधुन मिळाली...
अस कस झाल. Uhoh

जबरदस्त प्रचि २,३,४,५ खासच, शेवट्चे दोन मस्तच Happy

हा माझा झब्बु चालेल ना Wink

किल्ल्यात भाज्या आणि भातशेतीही करतात.


या बेटावर गोड्यापाण्याच्या बर्‍याच विहीरी आहेत.

वा फोटो छान.
एक भा. प्र. जंग्या ९० किंवा ४५ शंकाच्या कोनात असतात. इथे मात्र एकाच दगडात जुळ्या आणि तिळ्या जंग्या >>> म्हणजे काय? हसु नये खरच माहिती नाही म्हणुन विचारले.

पेशवेकालीन शिलालेख आहे, तो कसा राहिला? >>> हेम... रो.मा. कडे असेल शिलालेखाचा प्रचि.

नितीन... शेताडीचे प्रचि सुंदर आहेत.

जंग्या >>> म्हणजे काय? >>> बुरुजांवर असणारे आयाताकृती आकाराचे चिंचोळे झरोखे म्हणजे जंग्या. त्या झरोख्या मागूर तिरंदाज बुरुजा खालील/समोरील लक्षाचा अचूक वेध घ्यायचे... साधारणतः एका दगडात एक झरोखा अशी रचना इतर गडांवर पहावयास मिळते. ९० अंशाचा कोन असलेल्या जंग्या मधून काटकोनातील म्हणजे समोरील लक्षाचा वेध घेता येतो... तर ४५ अंशाचा कोन असलेल्या जंग्यातून बुरुजा खालील लक्षाचा वेध घेणे सहज शक्य असते.