जिंदगी बेभान जगतो मी असा या भूवरी

जिंदगी बेभान जगतो मी असा या भूवरी

Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 14:42

मार्ग सत्याचा खुला आहे समोरी जोवरी
जिंदगी बेभान जगतो मी असा या भूवरी

शाम नामाने भुलूनी राधिका झाली हरी
शोधते ती राधिकेला होउनीया बावरी

ती रसोई जानकीची येइ वर धरणीतुनी
नारिच्या नशिबात चूलच सत्य सांगे 'बाबरी'

देउनी किरणे जगाला तो रवी दमला असा
सांज होता तो रथाच्या सप्त वाद्या आवरी

जीर्ण साडी फाडुनी केली तयाची गोधडी
रंग त्याचा उजळला तो बाळ बसता त्यावरी

गुलमोहर: 
Subscribe to RSS - जिंदगी बेभान जगतो मी असा या भूवरी