जिंदगी बेभान जगतो मी असा या भूवरी

Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 14:42

मार्ग सत्याचा खुला आहे समोरी जोवरी
जिंदगी बेभान जगतो मी असा या भूवरी

शाम नामाने भुलूनी राधिका झाली हरी
शोधते ती राधिकेला होउनीया बावरी

ती रसोई जानकीची येइ वर धरणीतुनी
नारिच्या नशिबात चूलच सत्य सांगे 'बाबरी'

देउनी किरणे जगाला तो रवी दमला असा
सांज होता तो रथाच्या सप्त वाद्या आवरी

जीर्ण साडी फाडुनी केली तयाची गोधडी
रंग त्याचा उजळला तो बाळ बसता त्यावरी

गुलमोहर: 

शाम नामाने भुलूनी राधिका झाली हरी
शोधते ती राधिकेला होउनीया बावरी

हे एका बंदिशीच्या मुखड्यावरुन घेतले आहे

माई री शाम शाम शाम रटत शामा शाम भई
पूछत अपने सखियन से शामा कहाँ गई ?

जामोप्या मस्तच प्रयत्न. वाटतच नाही की तुम्ही कालच गझल रचायला शिकलाय. Happy

आनंदयात्री बहुदा अरी हा काफिया असेल. :_

बाकी गझलेत तो,ती,ते,ते,त्या,ती ही एकवचनी,बहुवचनी सर्वनामे नसतील तर बरं.

नचिकेतशी सहमत आहे. आधी लक्षातच आले नाही. जोवरी व भूवरी असा मतला गझलतंत्रामुळे होत नाही. Happy