हितगुज दिवाळी अंक

हितगुज दिवाळी अंक, अनुभव, अपेक्षा, सूचना

Submitted by श्यामली on 9 November, 2011 - 11:57

हितगुज दिवाळी अंक २०११ वर दिलेल्या अभिप्रायांसाठी सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद.

यंदाचा हितगुजचा हा बारावा अंक. संपादक आयडीने एक धन्यवादाची पोस्ट टाकून दिवाळी अंक हे प्रकरण माझ्यापुरतं संपवता आलं असतं . पण मायबोलीशी असणारं नातं हे त्यातून असं सहज बाहेर पडू देत नाही. म्हणून हा पोस्ट प्रपंच.

आमच्याकडे आलेलं उत्तम साहित्य बघून आपण (मायबोलीकर) अजून चांगला अंक देऊ शकतो असं जाणवल. त्यासाठी जुन्या जाणत्यांच मार्गदर्शन आवश्यक आहेच, हे ही जाणवलं. नवीन मंडळींच्या नव्या कल्पनांना जुन्या जाणत्यांच्या सूचना, सल्ले याची साथ असेल तर पुढे येणारे अंक अजून चांगले होतील यात शंका नाही.

विषय: 

दिवाळी अंक २०११ स्वयंसेवक घोषणा

Submitted by रूनी पॉटर on 8 August, 2011 - 19:38

मायबोली दिवाळी अंक २०११ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा.
१. दिवाळी अंक संपादन
२. दिवाळी अंक रेखाटन
३. दिवाळी अंक सजावट
४. दिवाळी अंक साचा (template - यासाठी दृपल मध्ये कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य)
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)

Subscribe to RSS - हितगुज दिवाळी अंक