सुभाष इनामदार

वा गुरू

Submitted by सुभाष इनामदार on 6 April, 2012 - 12:08

चंद्रशेखर फणसळकरांच्या नविन नाटकातली दिलीप प्रभावळकरांची भूमिका पाहल्यानंतर नाट्यरसिकांच्या मनात सहजच एक शब्द घुमतो तो म्हणजे `वा गुरू`. मृत्यूचे भय न बाळगता आयुष्यातल्या जुन्या स्मृतींना जागवत आपल्या मनात सतत असणा-या विचारांना बोलते करणारा हा हाडाचा शिक्षक. पायापासून हळूहळू एकेक अवयव काम न करताना दिवसेंदिवस शरीराने खंगत जातो. ती वेदना हसत हसत झेलताना आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपल्या एके काळच्या प्रिय विद्यार्थ्याजवळ सांगतात. सगळे नाटकच थोड्याफार फरकाने गंभीर आहे.

विषय: 

पिंपळपान...

Submitted by सुभाष इनामदार on 6 April, 2012 - 12:02

जाळी झालेले एक पान सहज वहीत गवसले
जणू जुन्या स्मृतींना देत त्या आठवणी साठवित पहुडले

किती दिवस झाले आता निटसे आठवत नाही
किती स्वप्ने गळून गेली आता ती उगाळायची नाही

वाट पाहुन थकलेले पाय कधीचेच थांबलेले
आता नव्या स्वप्नांच्या धुंदीत तेही विसावलेले

उरी चेतल्या , जागल्या त्या आठवांच्या नोंदी
किती आणा, शपथा ती होती एक धुंदी

नाही साहवेना आता जुनी झाली गाठोडी
चेतावली त्यात आता अंधुकशी चिंधोटी

सारी कधी स्वप्ने पुरी होत असतात का ?
तरीही कुणी ती पाहायची सोडतात का ?

गेली वर्षे आणि महिने गेला तो काळ
पिंपळाची जीर्ण पाने सुकलाही तो बाळ

नांदती सुखी आता दोन जीव दोही दिशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सुभाष इनामदार