लोगो संगणकभाषा (प्रोग्रामिंग लँग्वेज)

लोगो संगणकीय भाषेविषयी माहिती हवी आहे.

Submitted by अश्विनी डोंगरे on 21 August, 2012 - 00:55

लेकाला इयत्ता ३ रीच्या सायबर ऑलिंपियाडसाठी लोगो संगणकभाषा ह्या विषयाची जुजबी माहिती हवी आहे. गुगलवर शोधले, विकीमध्ये काही माहिती आहे, पण ती वय वर्षे ८ ला कशी समजवावी हा प्रश्न आहे.
काही basic commands, नेहमी वापरल्या जाणार्‍या संज्ञा- त्यान्चे अर्थ अशा स्वरुपाची माहिती अपेक्षित आहे.
कोणी जाणकार असल्यास कृपया माहिती द्या.

लोगो संगणकभाषा (प्रोग्रामिंग लँग्वेज)

Submitted by Ajay Bhagwat on 17 January, 2012 - 12:01

लोगो भाषा ही एक संगणकभाषेच्या शिक्षणासाठी शैक्षणीक साधन म्हणून १९६७ साली निर्माण केली गेली. "लोगो" हा एक ग्रीक शब्द असुन त्याचा अर्थही "शब्द" असाच आहे. लोगो संगणकभाषा अत्यंत सोपी, पण समर्थ भाषा आहे. लोगोला "लो फ़्लोर हाय सिलींग" भाषा असेही म्हणतात. म्हणजे, लोगोच्या अद्भुत जगात प्रवेश करून प्रोग्रॅमिंगची मजा लुटणे सुरू करणे कुणीही सहजगत्या करू शकते. पण याचा अर्थ असा नाही की, ती केवळ लिंबू-टिंबूंची भाषा आहे. लोगोमध्ये अवघड समस्या सोडवणे व क्लिष्ट प्रोग्रॅम लिहिणेही शक्य आहे.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - लोगो संगणकभाषा (प्रोग्रामिंग लँग्वेज)