विहंग

विहंग रंग २.......कुदळ्या (Black Ibis)

Submitted by भालचन्द्र on 26 February, 2013 - 11:26

हा एक वैषिष्ठ्यपूर्ण मोठा पक्षी आहे......
चोचीच्या विशिष्ट आकारामुळे याला कुदळ्या असंही एक नाव आहे. याच्या डोक्यावर लाल पागोटं आणि कुशीवर पंखात पांढरा ठिपका असतो. पाणपक्षी असला तरी याला पाणी हवंच असं नाही. माळावर, शेताच्या बांधावर व इतर ठिकाणी दिसू शकतो. मासे, बेडूक, सरडे, किडे हे त्याचं खाद्य. अत्यंत कर्कश अवाजात ओरडतो !!!

IMG_0403 re.JPGIMG_0406 re.JPG

विहंग

Submitted by उमेश वैद्य on 5 October, 2011 - 09:05

विहंग

जसे उगवती नभी विहरती खगांचे थवे
तसेच असती प्रतिक्षण नवे जगाया हवे
मजेत क्रिडती नसे अमुकची तयांना दिशा
पहात उडती उषा परतती बघता निशा

खुषाल क्षण जे समीप तव ते उभे राहती
तिथेच रमणे तया गमत ना कशाची भिती?
विहंग गलका तरंग उठता जळी पांगला
निमीत्त कण जो मिळेल टिपण्या तिथे रंगला

क्षणात उडता ढगात शिरता तयांच्या मनी
निळॆच जलधी निळॆच नभही तया लागुनी
इथे मजसवे असोत सगळे सुखाचे धनी
परी न तसली सुखे मिळत ना मला जीवनी

असेच जगणे मला न जमले खगांच्या परी
उदास उरणे उगाच हसणे नशीबा वरी

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - विहंग