माझं स्वप्न

मला पडलेली स्वप्ने

Submitted by यदुनाथ on 7 December, 2016 - 06:01

कधी कधी आपल्याला कशाहीप्रकारची स्वप्ने पडतात. अशाच काही स्वप्नान्ची माहीती इथे द्यावी..

विषय: 
शब्दखुणा: 

माझं स्वप्न

Submitted by सखीप्रीया on 20 June, 2011 - 22:47

पाऊस्....धुव्वाधार कोसळणार्‍या अविरत जलधारा नजरेसमोर असव्यात. मी व्हरांड्यात आरामखुर्चीत निवांत विसावलेली. व्हरांड्याच्या तिनही बाजूंनी हिरवीगार झाडे-जी पावसाच्या गारव्याने ओली चिंब भिजलेली. मधुनच येणार्‍या वार्‍यामुळे डोलणारी जणू स्वतःच्या धुंदीत मस्तावलेली - जणू कुठलंतरी मधुर संगीत एकत असलेली. मीही हातात गरमागरम कॉफीचा, वेलचीचा सुगंध दरवळणारा मग हातात घेऊन कोणत्यातरी आवडीच्या सुरावटींना मनात्,कानात साठवत असलेली. वाहणार्‍या वार्‍याच्या तालावर पाऊसही धुंद झालेला. धुरकट धुक्यासारखा मधुनच माझ्या अंगावर असंख्य तुषार उडवत मला साद घालणारा. समोरुन येणारी पायवाट, बाजुला भिजलेली मखमली हीरवळ.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माझं स्वप्न