मला पडलेली स्वप्ने

Submitted by यदुनाथ on 7 December, 2016 - 06:01

कधी कधी आपल्याला कशाहीप्रकारची स्वप्ने पडतात. अशाच काही स्वप्नान्ची माहीती इथे द्यावी..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या मला प्रॅक्टिकल चे जर्नल्स अपुर्ण आहे आणी दोन दिवसात परिक्षा सुरु होणार आहे असली स्वप्न पडायला लागलीत. च्यायला, कॉलेजचा संबंध संपुन २० वर्षे झाली, अजुन परिक्षेचीच स्वप्ने? Sad

माझ्या बारावीच्या निकालाच्या दिवशी पहाटे मला स्वप्न पडले की, मी कॉलेजमध्ये पहिला आलोय.......पहाटेचे स्वप्न खरे होईल या आनंदात निकाल पहिला, तर मी पाचवा होतो.....आणि कॉलेज टॉपरला माझ्यापेक्षा २० मार्क्स जास्त होते......माझा पूर्ण मूड ऑफ झाला होता.......

पण, १० दिवसांनंतर जाहीर झाले की, राज्यस्तरीय कोणत्याही खेळातल्या विद्यार्थ्यांना जास्तीचे २५ गुण देण्यात येतील, आणि स्वप्न खरंच खरं झालं