रिमझिम्म....!

Submitted by बागेश्री on 23 August, 2011 - 13:23

खट्याळपणे आपल्याच धुंदीत,
माझ्या छत्रीवर बरसणारा तू....
आणि 'पिया बसंती रे....' गुणगुणत
घराच्या दिशेने निघालेली मी......

मन निवांत असलं ना, की तुझी बरीच रुपं दिसतात, साठवता येतात.... लोभसवाणी, निव्वळ..!
बर्‍याच दिवसांनतर झालेली लाडकी जाणीव.....!!

काळाशार डांबरी रस्ता, मस्त ओला झालेला
त्यावरचे तुझे तुषार....
भरधाव गाड्याच्या पिवळ्या झोतांमुळे मोहक दिसणारे तुझे थेंब...!

हिरवीगार पाने, त्यावरची ओल आणि रस्त्यांच्या कडेच्या लाईट्समुळे त्यावर
उतरलेली चमक.....

गढूळ पाण्याचे इवले-मोठे डबके,
त्यात तू धरलेला नाद!

सगळं कसं ल-य-ब-द्ध!

छत्रीवर, रस्त्यांवर, झाडांवर, डबक्यांमधे - रमलेले सूर...... सारेच गळात गळा घालून!

सकाळपासून शांत- एकलं उभं असलेलं माझं घर...
"सक्काळची जी जातेस, ती अंधारल्यावरच मला भेटतेस"- घराने रोजची कुरबूर केली....
आत आले दरवाजा उघडून...!

तुझा बाहेरचा नाद, आत काहिसा धीर-गंभीर जाणवला!

का रे असं..?

आत जबाबदार्‍या होत्या म्हणून??

बाहेरही असतातच की....
कदाचित जरा जास्त...!

मग हा बदल कसा?
की,
मघाशी काही क्षण, "मी" कोणाचीच नव्हते?

तू- रस्ता- डबकी- पिया बसंती- छत्रीवरचा ताल आणि...... आणि बरंच काही...

छान वाटलं रे, हलकं जरासं!
किमान थोडावेळासाठी तरी,

'स्व' ला गमावणं...!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

CHHAN AAHE........SWATH LA SWATHA CHYA BHABANNAN SATHI KAHI TARI NAKKICH KELE PAHIJE

छान वाटलं रे, हलकं जरासं!
किमान थोडावेळासाठी तरी,

'स्व' ला गमावणं...!
>>>>

आवडलं मला बागेश्री! खूप छान.. Happy

अहाहा! सुंदर!!
सकाळी सकाळीच हे असं काही प्रसन्न वाचायला मिळालं की दिवस कसा छान जातो.
असंच लिहीत रहा बागेश्री Happy

बागु दिवसाची कशी झक्क सुरुवात करून दिलीस बघ. खूप ''आपलेपण'' आहे तुझ्या कवितेत. अतिशय टचिंग.
छान वाटलं रे, हलकं जरासं!
किमान थोडावेळासाठी तरी,

'स्व' ला गमावणं...!>>>>>> कधीतरी प्रत्येकाने ''स्व'' ला गमवून जीवनातल्या गोष्टींचा आनंद घ्यायलाच हवा. त्याने खरंच खूप हलकं वाटतं हे ''सोला आने सच'' आहे....पुलेशु.

खट्याळपणे आपल्याच धुंदीत,
माझ्या छत्रीवर बरसणारा तू....
आणि 'पिया बसंती रे....' गुणगुणत
घराच्या दिशेने निघालेली मी......>>>>>>>>>>>>> सहीच.... Happy

>>सकाळी सकाळीच हे असं काही प्रसन्न वाचायला मिळालं की दिवस कसा छान जातो.

जरा माझ्या प्रतिसादात बदल. सकाळीच नव्हे तर दिवसाच्या कुठल्याही वेळी हे वाचलं तर दिवसातला उर्वरित वेळ छान जाईल.

बागेश्री, तुझ्या अशा रचनांमधली (हो, हे ललित मधे का टाकलंय?) मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे दैनंदिन आयुष्यातील गोष्टी आणि घटनांचं तू अत्यंत सूक्ष्म निरिक्षण करुन त्याचा लेखनात अत्यंत साधे शब्द आणि उपमा यांद्वारे वापर करतेस - ती हातोटी तुला साधली आहे.

पुढच्या लेखनाच्या प्रतीक्षेत.

बागुडी.. रिमझिम्म्..तुझ्याच्चसारखी 'लोभसवाण''आहे Happy

पावसाचं आणि त्यावेळच्या वातावरणाचं वर्णन छानच जमलंय.
तसंच शेवट देखील प्रभावी झालाय. लेखन आवडलं.
---------------------------------------------------------------------------
अशा प्रकारच्या लेखनाला ’स्फुट’ किंवा असंच काहीतरी म्हणतात का ?

मस्तय Happy

छान Happy

मन निवांत असलं ना, की तुझी बरीच रुपं दिसतात, साठवता येतात.... लोभसवाणी, निव्वळ..!
बर्‍याच दिवसांनतर झालेली लाडकी जाणीव.....!!
>>>>
व्हेरी ट्रु!! सगळ्याच बाबतीत हे खरं आहे! Happy

लाडकी जाणीव - i just loved this usage.. जाणिवा हव्याशा, नकोशा, सुखावणार्‍या, दुखावणार्‍या असतात, पण त्या लाडक्याही असतात, हे खासच! Happy

तुझा बाहेरचा नाद, आत काहिसा धीर-गंभीर जाणवला!

का रे असं..?

आत जबाबदार्‍या होत्या म्हणून??
>> हेही मस्त..

बाकी बागेश्री टच आहेच!
Happy