राजा राणी

'राजा-राणी' शतशब्दकथा

Submitted by हर्पेन on 29 August, 2013 - 13:49

ती म्हणाली, राजा, मला किनई, दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय.

ती म्हणाली, आपण किनई भांडी घासायला एक बाई ठेवू, धुणी धुवायला एक.
मला किनई दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय

तो म्हणाला होय राणी.

ती म्हणाली, आपण किनई खोल्या झाडायला एक बाई ठेवू, फरश्या पुसायला एक.
मला किनई दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय

तो म्हणाला होय राणी.

ती म्हणाली, आपण किनई स्वैपाक बनवायला एक बाई ठेवू, वरकामाला एक.
मला किनई दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय

तो म्हणाला होय राणी.

Subscribe to RSS - राजा राणी