तन्वीर सन्मान सोहळा

तन्वीर सन्मान सोहळा - २००९

Submitted by चिनूक्स on 5 April, 2011 - 00:46
सहावा तन्वीर सन्मान सोहळा ९ डिसेंबर, २००९ रोजी पुण्यात आयोजित केला गेला. सत्कारमूर्ती होते डॉ. राजेंद्र चव्हाण आणि श्रीमती विजया मेहता. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वसंध्येला झालेली श्रीमती विजया मेहता यांची मुलाखत. विजयाबाईंची नाटकं, त्यांचा नाट्यक्षेत्रातला प्रवास यांविषयी तरुण पिढीला फारशी माहिती नाही. दिग्दर्शिका व अभिनेत्री म्हणून त्यांनी केलेलं प्रचंड काम या पिढीनं पाहिलेलं नाही. हे लक्षात घेऊनच ही मुलाखत आयोजित केली गेली होती. श्री. माधव वझ्यांनी काही वर्षांपूर्वी 'सा.

तन्वीर सन्मान सोहळा - २००८

Submitted by चिनूक्स on 28 February, 2011 - 02:39
पाचवा तन्वीर सन्मान सोहळा पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ९ डिसेंबर, २००८ रोजी आयोजित केला होता. त्या वर्षीचे सत्कारमूर्ती होते पं. सत्यदेव दुबे आणि श्री. गजानन परांजपे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ नाटककार श्री. गो. पु. देशपांडे. पं. सत्यदेव दुबे आणि श्री. गजानन परांजपे यांच्या कारकिर्दीचा आढावा नाटककार श्री. मकरंद साठे, श्री. गोविंद निहलानी व श्रीमती नीना कुलकर्णी यांनी घेतला.
विषय: 

तन्वीर सन्मान सोहळा - २०१०

Submitted by चिनूक्स on 4 January, 2011 - 02:38
तन्वीर हा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांचा मुलगा. एका अपघातात सोळा वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. तन्वीरच्या जाण्याचं दु:ख बाजूला ठेवून त्याचा वाढदिवस साजरा करावा, अशी कल्पना पुढे आली, आणि तन्वीर सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली. दरवर्षी ९ डिसेंबरला, तन्वीरच्या वाढदिवशी, हा सोहळा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांनी स्थापन केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानातर्फे पुण्यात आयोजित केला जातो.
विषय: 
Subscribe to RSS - तन्वीर सन्मान सोहळा