आगळा

अजून श्रावण फुलतो दारी

Submitted by पुरंदरे शशांक on 16 November, 2026 - 22:56

हात घेऊनी हातात कोडे
उलगडले ते कठीण काही
शब्द कशाला हवेत वेड्या
तोच आगळा श्रावण पाही

नको ताटवे फुला फुलांचे
नकोच कुठल्या झुलत्या वेली
कौतुक मिश्रित थाप पाठीवर
तिथेच खुलते श्रावण स्वारी

मनापासूनी सौम्य सुखावे
असे बोलणे स्फुरे जराही
सप्तरंगही तिथेच खुलती
श्रावण दाटी मनोमनीही

शुद्ध मनाने निर्मळतेने
सुहास्य ठाके निरहंकारी
असो नसो वा देण्या काही
अजून श्रावण फुलतो दारी

Subscribe to RSS - आगळा