शशक स्पर्धा - ओबामा -डल्ला
Submitted by ओबामा on 22 September, 2026 - 21:02
मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात, आमराईत बारीक अंगकाठीची ती एकलीच झाडाखाली पडली व्हती. तिला बघताच गावातल्या टवाळ पोरांच्या डोळ्यात चमक आली आणि तोंडातून लाळ टपकू लागली.
"अरं, लईच भारी मोका हाय! धर घट्ट तिला!" म्होरक्या कुजबुजला.
दोघांनी वरनं, दोघांनी खालनं आणि झाडाशी गच्च दाबून धरलं.... "भाई, घाई करा! माल बघून जीव हैराण झालाय!"
विषय: