Submitted by ओबामा on 22 September, 2026 - 21:02
मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात, आमराईत बारीक अंगकाठीची ती एकलीच झाडाखाली पडली व्हती. तिला बघताच गावातल्या टवाळ पोरांच्या डोळ्यात चमक आली आणि तोंडातून लाळ टपकू लागली.
"अरं, लईच भारी मोका हाय! धर घट्ट तिला!" म्होरक्या कुजबुजला.
दोघांनी वरनं, दोघांनी खालनं आणि झाडाशी गच्च दाबून धरलं.... "भाई, घाई करा! माल बघून जीव हैराण झालाय!"
म्होरक्या तमाखूची पिचकारी टाकत, पिवळे झालेले दात दाखवत विकट हसला. ओठांवरून जीभ फिरवत व हाताच्या बाह्या दुमडून म्हणाला, "व्हय रं, आता बघा माझा खेळ!"
....
.....
.....
......
.....
.......
म्हणता म्हणता तो भराभर काठीच्या शिडीवरून फांदीवर चढला आणि पानांमागे लपलेल्या आंब्यांवर डल्ला मारला. खाली पोरं आंब झेलायला तयारच होती.
**********
शब्दसंख्या -१००
रस - शृंगार, हास्य
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अंदाज आला होता दुसरं काहीतरी
अंदाज आला होता दुसरं काहीतरी असेल. पण शिडी सुचलं नव्हतं. चांगली जमली आहे.
अलंकार कोणता तेही लिहा.