आदरणिय खामेनींजींचे महापरिनिर्वाण ?
Submitted by एक लेखक on 1 March, 2026 - 13:50
अयातुल्ला खामेनींचं वृत्त बड्या जागतिक वृत्तसंस्थांकडून आलेलं आहे. तसंच इराणच्या वृत्तसंस्थांनीही ते दिलं आहे.
मात्र सुरूवातीला इस्त्राएलच्या दाव्यानंतर इराणच्या प्रधानमंत्र्यांनी ते जिवंत असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर काही वेळाने दुसर्या नेत्याने ते मृत झाल्याची बातमी स्विकारली. पण त्यांच्या पार्थिवाचे चित्रण कुठेही दिसलेले नाही. अंत्यसंस्कारांचा पुरावा नाही.
३६ वर्षे एखाद्या देशावर राज्य करणारा नेता जर मारला गेला तर गोंधळाची स्थिती निर्माण होते. त्याचा फायदा घेऊन अमेरिकेसारखे देश तिथे आपला बाहुला बसवतात.
विषय:
शब्दखुणा: