आदरणिय खामेनींजींचे महापरिनिर्वाण ?

Submitted by एक लेखक on 1 March, 2026 - 13:50

अयातुल्ला खामेनींचं वृत्त बड्या जागतिक वृत्तसंस्थांकडून आलेलं आहे. तसंच इराणच्या वृत्तसंस्थांनीही ते दिलं आहे.

मात्र सुरूवातीला इस्त्राएलच्या दाव्यानंतर इराणच्या प्रधानमंत्र्यांनी ते जिवंत असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर काही वेळाने दुसर्‍या नेत्याने ते मृत झाल्याची बातमी स्विकारली. पण त्यांच्या पार्थिवाचे चित्रण कुठेही दिसलेले नाही. अंत्यसंस्कारांचा पुरावा नाही.
३६ वर्षे एखाद्या देशावर राज्य करणारा नेता जर मारला गेला तर गोंधळाची स्थिती निर्माण होते. त्याचा फायदा घेऊन अमेरिकेसारखे देश तिथे आपला बाहुला बसवतात.

मात्र इराणने काही तासातच दुसरा नेता त्या पदावर बसवला. सर्वोच्च नेत्याच्या निधनानंतर मनोबल खच्ची झाले आहे असे न दिसता इराणने कडवे प्रत्त्युत्तर दिले. अमेरिकेची अब्राहम लिंकन ही विनाशिका इराणने डुबवली असा दावा करण्यात आलेला आहे.

यामुळे खामेनींचा मृत्यू खरंच झाला आहे का असा प्रश्न काही जण विचारत आहेत.

याला कारण म्हणजे युद्धात माहितीच्या युद्धाचा समावेश असतो. युद्धाच्या काळात प्रसारमाध्यमे कुठल्यातरी एका बाजूला झुकलेली असणे हे अगदी नेहमीचं झालेलं आहे. याचा अनुभव जगाने १९९१ च्या इराक युद्धात घेतलेला आहे. खामेनींचा मृत्यू हा अशा डावपेचांचा भाग असू शकतो.

मात्र इराणने तो स्विकारण्यात त्यांचा काय लाभ ?
तर इराक मधे सद्दाम हुमधेला शोधून मारले तसे खामेनींच्या बाबतीत होऊ नये यासाठी पूर्वनियोजित खेळी असू शकते. अर्थात या सर्व शक्यता आहेत. कोणताही गोंधळ न होता दुसरा नेता निवडला जाणे आणि हल्ले तीव्र होणे या गोष्टी नेता जिवंत असण्याकडेही निर्देश करतात.

त्याच वेळी इस्त्राएलच्या मोसादने अचूक माहिती काढून गेम केला असावा आणि इराणकडे नेता निवडीची मजबूत प्रक्रिया तयार असल्याने नेता लगोलग निवडला गेला असावा ही शक्यता पण उरते. नेत्याच्या मृत्यूनंतर शहादतच्या अपीलमुळे बदल्याच्या भावनेने हल्ले तीव्र झाले असतील ही शक्यता देखील आहे.

युद्धजन्य परिस्थितीत कोणती माहीती खरी कोणती खोटी याचा अंदाज करणे कठीण असते.

इतिहासात यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस, स्टॅलिन (रशिया), किम जोंग, किम त्सुंग (दोघेही उत्तर कोरिया) अशा नेत्यांच्या मृत्यूबद्दल संदिग्धता होती. स्टॅलिनने स्वतः अफवा पसरवलेल्या नव्हत्या, पण त्याने निराकरणही केले नव्हते. त्याने त्या अफवा तशाच पसरू दिल्या होत्या.

तुम्हाला याबद्दल काय वाटते ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यंतरी वाचनात आले होते की इराणच्या खामेनी यांनी त्यांच्या सगळ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना त्यांचे तीन उत्तराधिकारी निवडायला सांगितले आहेत. त्यात प्राधान्य क्रमाप्रमाणे जो जिवंत असेल त्याला उत्तराधिकारी घोषित केले जाईल. युध्दाच्या गोंधळात कुठलाही विभाग नेतृत्वहीन राहून गडबड होऊ नये याकरता ही दक्षता.

Trump चे डुआयडी त्याला माहिती पुरवतात. अमेरिकन अध्यक्षाला वेळ घालवायला असं काही तरी करावंच लागतं.

ओबामा भाषणं द्यायचे. त्यांनी तर युद्ध पण नाही केलं.

नेतान्याहू यांच्या मृत्यूचे क्लेम होत आहेत. नेतान्याहू यांचा एक व्हिडीओ इस्त्राएलने जारी केला आहे तो ए आय असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रश्न असा आहे कि नेतान्याहू जर जिवंत आहेत तर ए आय व्हिडीओ का ?

या दरम्यान इस्त्राएलकडून एक स्पष्टीकरण आले जे संदिग्ध आहे. पण ते स्पष्टीकरणच फेक आहे असे आणखी एक स्पष्टीकरण आले आहे.