मी पाहिलेली लैंगिक अल्पसंख्यांकांची पॉंडिचेरी
Submitted by सोनू. on 21 September, 2025 - 10:04
पॉंडिचेरीमधे मी ज्या रेस्टॉरंट मधे काम करायचे ते मालक, म्हणजे माझे घरमालक - पीचया, स्वतः गे होते. तिथल्या फ्रेंच भागात सर्व प्रकारचे लैंगिक संबंधं समाजमान्य आहेत पण आजूबाजूलाही तसा कमी "तिरस्कार" पाहण्यात आला. तिरस्कार म्हणतेय कारण रेस्टॉरंटमधे येणाऱ्या काही भारतीय लोकांची तशी भावना दिसली होती. माझं काम रेस्टॉरंट मधे आलेल्या लोकांशी गप्पा मारणं हे असल्याने बऱ्याच लोकांशी मी दिलखुलास गप्पा मारत होते. तिथे काहींनी मला "हा माणूस गे आहे, इथे तुला काही त्रास होऊ शकतो मग इथे का राहातेस" असं विचारलं होतं.
विषय: