‘बॉय’ ऑर ‘गर्ल’?
Submitted by एम.जे. on 25 November, 2024 - 21:12
गंगोत्रीहून सोनप्रयागच्या वाटेवर पाय मोकळे करायला बसमधून उतरलो होतो तेव्हा गप्पाष्टकांचा घोळक्यात न्यूजर्सीहून आलेली मरिया होती. तिचे आईवडील इटलीहून अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत येऊन वसलेले. साहजिकच अमेरिकेत वाढलेली असली तरी मरियाच्या बोलण्यात इटालियन लहेजा होता. तिचं बोलणं ऐकताना बीबीसीची ‘माईंड युअर लँग्वेज’ मालिकेची आठवण झाली. गोरा वर्ण, भुरे केस, मध्यम बांधा आणि घरेलू, कुटुंबवत्सल लूक असलेली मरिया प्रवासाने जास्तच थकल्यासारखी वाटत होती.