दिशाहीन

दिशाहीन

Submitted by दत्तात्रय साळुंके on 12 September, 2024 - 00:49

जेव्हा काळोख घेरतो
डोळा अंधार पेरतो
वाटही नाही दिसत
मी गच्चीत बसतो

मी मनाला घाबरतो
समोरचा वाहता रस्ता
बोट माझे पकडतो
बघ माणसं म्हणतो

कशी वाट चालतात
कुठे आशा पल्लवित
कुठे दिशाहीन दिशा
गती तरी पावलात

जिप्सी तुझा ठेव जीता
छान जगशील आता
डाव पुन्हा मांडशील
जीवनाशी भिडशील

असं जगता जगता
हसतमुख गाशील
कशाला पोथी पुराणं
चालनच जीवनगाणं

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - दिशाहीन