Submitted by दत्तात्रय साळुंके on 12 September, 2024 - 00:49
जेव्हा काळोख घेरतो
डोळा अंधार पेरतो
वाटही नाही दिसत
मी गच्चीत बसतो
मी मनाला घाबरतो
समोरचा वाहता रस्ता
बोट माझे पकडतो
बघ माणसं म्हणतो
कशी वाट चालतात
कुठे आशा पल्लवित
कुठे दिशाहीन दिशा
गती तरी पावलात
जिप्सी तुझा ठेव जीता
छान जगशील आता
डाव पुन्हा मांडशील
जीवनाशी भिडशील
असं जगता जगता
हसतमुख गाशील
कशाला पोथी पुराणं
चालनच जीवनगाणं
© दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिशाहीनता छान गुंफली आहे !
दिशाहीनता छान गुंफली आहे !
सुंदर कविता नेहमीप्रमाणे ..!
सुंदर कविता नेहमीप्रमाणे ..!
सुरेख. खूप सकारात्मक आणि
सुरेख. खूप सकारात्मक आणि काव्यमय.
कुमार सर,
कुमार सर,
रुपालीताई,
सामो
अनेकानेक धन्यवाद...
आवडली!
आवडली!
केशवजी ... अनेकानेक धन्यवाद
केशवजी ... अनेकानेक धन्यवाद
कवितेचे शीर्षक कवितेशी
कवितेचे शीर्षक कवितेशी मिळतेजुळते असण्याचा योग बऱ्याच वर्षांनी बघायला मिळाला..
बेफिकीर.... धन्यवाद...
बेफिकीर....
धन्यवाद...