बारामतीकरांची बखर

बारामतीकरांची बखर..!

Submitted by संप्रति१ on 4 July, 2023 - 10:01

एकास पळ म्हणावे, दुसऱ्यास धर म्हणावे, तिसऱ्यास बघ म्हणावे आणि चवथ्यास म्हणावे की तुजला काही कुमक पाहिजे असल्यास आम्ही आहोतच. आपण येकदा बसून बोलिले पाहिजे..!
दहा दिशांनी दहा नौका सोडोन मनासारिखे घडेतो दुरून पहात बैसावे. ऐशी पवारसाहेबी मसलत. त्याच पवारसाहेबी गोटात गलबला जाहला त्याचि गोस्ट.
परंतु हे ही खेळ अवघे साहेबांचेच आहेत, असे लोक म्हणताति. खरे खोटे ईश्वर जाणे.

Subscribe to RSS - बारामतीकरांची बखर