शान्ता शेळके

मराठी भाषा दिवस : सरस्वतीची चिरंजीव मुले - शान्ता शेळके - भरत.

Submitted by भरत. on 1 March, 2022 - 09:51

शान्ता शेळके माझ्या सर्वाधिक आवडत्या कवयित्री. त्यांचं नाव, चेहरा आणि त्यांच्या रचना यांची एकत्रित ओळख ठसठशीतपणे केव्हा झाली ते आठवायचा प्रयत्न करतोय. माझं दहावी १९८३ चं. १९८२ मध्ये घरी टीव्ही आलेला, पण त्याने तोवर घड्याळातल्या सगळ्या घरांवर हक्क सांगितला नव्हता. कवी-लेखक दिसायचे ते पाठ्यपुस्तकात तेही नववीपासूनच्या - म्हणजे कुमारभारती आणि मग युवकभारती ; क्वचित वर्तमानपत्रात. पृथ्वीचे प्रेमगीत लिहिणारे कुसुमाग्रज आणि त्यांचं भव्य कपाळ, केवळ माझा सह्यकडा सोबतच्या वसंत बापटांचा चौकडीचा शर्ट हे लक्षात होते. बालकवींनी मात्र आधीपासूनच मनात जागा पटकावून तिथे नावही लावलं होतं.

Subscribe to RSS - शान्ता शेळके