मनातल्या उन्हात मी

मनातल्या उन्हात मी.....

Submitted by संयम.... on 11 January, 2022 - 13:45

मनातल्या उन्हात मी ......

मनातल्या उन्हात मी, का असा हिंडतो
कारण माझ्या असण्याचं, सतत शोधू पाहतो

असेल काही उद्देश त्याचा, मनाची समजूत घालतो
गुमान मुंग्यांच्या रांगेमध्ये, नाकासमोर चालत राहतो
मनातल्या उन्हात मी ......

अचानक जेव्हा पेपरमध्ये, दुर्बल सोशीत वाचतो
विस्तवास माझ्यातल्या, फुंकर पुन्हा घालतो
स्वकर्तृत्वावर जग बदलण्याची, पुन्हा खूणगाठ बांधतो
भारावलेल्या सरड्यासारखा, कुंपणापर्यंतचं धावतो
मनातल्या उन्हात मी ......

Subscribe to RSS - मनातल्या उन्हात मी