Submitted by पुरंदरे शशांक on 16 May, 2012 - 01:09
माकडाचा शॉवरबाथ.....
एक हत्ती गेला तळ्यात
पोहत होता मजेत पाण्यात
सोंडेत घेतले पाणी भरुन
अंगावर घेतो शॉवर मारुन
शॉवर बघता असला भारी
माकडाला आली सुरसुरी
प्लीज प्लीज हत्तीदादा,
एवढे जरा ऐकता का
शॉवरने छान भिजवाल का
मलाही मज्जा येईल बघा
हत्तीदादा आपले गुणी
सोंड भरुन घेतले पाणी
माकडावर सोडता शॉवर
जरा जोरात बसली फुंकर
माकड गेले हेलपाटत
हत्तीदादा बसले हसत
माकड म्हणते नको रे बाबा
शॉवर असला काय कामाचा
मजा तर राहिली लांब
अंग सारे शेकले जाम
पोहत राहीन खूप खूप
मस्त मजेत हूप हूप..........
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कसली गोड आहे कविता. फार्रच
कसली गोड आहे कविता. फार्रच आवडली. मला ती 'छान छान गोष्टी' कॅसेटमधली गोष्ट आठवली. खारीचं पिल्लु हट्ट करत असतं - मला हवाय पाऊस
मग हत्तीदादा हट्ट पुरवण्यासाठी सोंडीतनं फव्वारा उडवतो. तुमची कविता त्याहुन सरस झाली आहे.
जरा वेगळंच विचारते - योगायोगाने माझ्या मैत्रिणीच्या मुलीला वाढदिवसाची भेट म्हणुन भला मोठा माकड (सॉफ्ट टॉय) आणला आहे. त्यावर या कवितेची प्रिंट, तुमच्या नावासकट अर्था॑त, टाचुन देवु का? तिला फार आवडेल आणि ती मराठी शाळेतही जाते त्यामुळे वाचु शकेल.
जरुर मनिमाऊ - माझी कोणतीही
जरुर मनिमाऊ - माझी कोणतीही कविता / बालकविता कोणालाही आवडल्यास ती जरुर शेअर करावी / प्रिंट काढावी, माझी त्याला अजिबात हरकत नाही, उलट अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचल्याचा आनंदच आहे...
तुझ्या या सुंदर अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.....
मजा तर राहिली लांब अंग सारे
मजा तर राहिली लांब
अंग सारे शेकले जाम
पोहत राहीन खूप खूप
मस्त मजेत हूप हूप..........
वा शशांकजी मस्त आहे कविता
छान आहे बाल कविता !
छान आहे बाल कविता !
अरे वा ! शशांकजी, मस्त कविता
अरे वा ! शशांकजी, मस्त कविता ! आवडली !!
सर्वांना मनापासून
सर्वांना मनापासून धन्यवाद.....
मस्त आहे. उतरवून घेतली आहे.
मस्त आहे. उतरवून घेतली आहे. संध्याकाळी छोटीला ऐकवेन
मस्तच आहे ही बालकविता
मस्तच आहे ही बालकविता
छान - कल्पना आवडली.
छान - कल्पना आवडली.
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार.........
छान .... बालसुलभ कल्पना
छान .... बालसुलभ कल्पना चांगली मांडलेय.