नवरात्र नवदुर्गा स्तवन

नवदुर्गेचे स्मरण करु

Submitted by कविन on 10 October, 2021 - 05:54

चल चल सखये पूजन करु
नवदुर्गेचे स्मरण करु

त्रिशूळधारीणी रुप जिचे
त्या, शैलपुत्रीचे स्मरण करु
हिमालयाच्या पुत्रीला या
प्रथमेला चल नमन करु
चल चल सखये पूजन करु

तपस्विनी हे रूप जिचे
ब्रह्मचारिणी नाव तिचे
सखे रुप हे द्वितियेचे
त्या रुपाचे स्मरण करु
चल चल सखये पूजन करु

माथ्यावरती चंद्र जिच्या
त्या, दशभूजेचे स्मरण करु
चंद्रघंटा नाव असे तीज
तृतियेला चल नमन करु
चल चल सखये पूजन करु

Subscribe to RSS - नवरात्र नवदुर्गा स्तवन