सरमिसळ

सरमिसळ एक भयंकारी रोमांच पर्व दुसरें..पाणावलेली कथा

Submitted by मुक्ता.... on 9 September, 2021 - 15:27

सागवानी आराम खुर्ची मागेपुढे चरक चरक असा आवाज करत डोलत होती. खुर्चीजवळ एक जुने शिसम चे स्टूल घेऊन महादू बसला होता. बाजूने कुणी पाहिलं तर शुभ्र कापड मागेपुढे होतंय की काय असं कुणाला वाटावं. एव्हढा डॉक्टरांच्या धोतराचा सोगा महादू अडून दिसत होता।

महादू काळा,मध्यमवयीन तरतरीत माणूस. अर्धवट गुडघ्यापर्यंत आलेले धोतर, वापरणीचा पिवळट रंग आलेले जुनाट पण तरीही स्वच्छ. अंगात लाल , नाहीतर निळी बिनबाह्यांची बंडी घालायचा तो.कधी खांद्यावर शुभ्र पांढरा टॉवेल, क्वचित जीर्ण घोंगड्याचा तुकडा.
डोक्यावर गांधी टोपी. असा या महादूचा पेहराव.

विषय: 
शब्दखुणा: 

सरमिसळ एक भयंकारी रोमांच पर्व दुसरें...पाणावलेल्या कथा

Submitted by मुक्ता.... on 6 September, 2021 - 08:05

पाणावलेल्या कथा

माझे सरमिसळ पर्व एक अवश्य वाचावे अन्यथा या कथामालिकेची लिंक लागणार नाही.

गुलमोहराच्या फुलांचा जथ्थाचा जथ्था पश्चिमेवर दाटला असावा असा भारी रंग आज तिथे रंगला होता. आजोबांच्या गोऱ्या सुरकूतलेल्या चर्येवर निर्विकार भाव होते. डोळ्यांत तेव्हढे पश्चिम क्षितिजावरचे सूर्यबिंब जमा झाले होते. नाही म्हणायला ओठांवर मिशीच्या आडून थोडे पिवळे हसू उमटले होते. अगदी थोडे, फक्त त्यांना कळेल एव्हढेच. बाकी मात्र ते कुणालाही निर्विकार आणि एकटक असे मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत आहेत असेच वाटावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सरमिसळ