सरमिसळ एक भयंकारी रोमांच पर्व दुसरें..पाणावलेली कथा

Submitted by मुक्ता.... on 9 September, 2021 - 15:27

सागवानी आराम खुर्ची मागेपुढे चरक चरक असा आवाज करत डोलत होती. खुर्चीजवळ एक जुने शिसम चे स्टूल घेऊन महादू बसला होता. बाजूने कुणी पाहिलं तर शुभ्र कापड मागेपुढे होतंय की काय असं कुणाला वाटावं. एव्हढा डॉक्टरांच्या धोतराचा सोगा महादू अडून दिसत होता।

महादू काळा,मध्यमवयीन तरतरीत माणूस. अर्धवट गुडघ्यापर्यंत आलेले धोतर, वापरणीचा पिवळट रंग आलेले जुनाट पण तरीही स्वच्छ. अंगात लाल , नाहीतर निळी बिनबाह्यांची बंडी घालायचा तो.कधी खांद्यावर शुभ्र पांढरा टॉवेल, क्वचित जीर्ण घोंगड्याचा तुकडा.
डोक्यावर गांधी टोपी. असा या महादूचा पेहराव.

सकाळ झाली होती. "बिनी बिनी उजडल डागतर!"
महादू असं म्हणल्यावर सनसनाटी असे खळाळून हसू ऐकू आले. "बिनी बिनी, होय रे?",पुनश्च तेच खळाळून हसू!
नेहमीच हा शब्द महादू वापरत असे.डॉक्टरही नेहमी असेच खळाळून हसत असत. महादू म्हणजे होल न सोल असा केअर टेकर होता डॉक्टरांचा. म्हणजे दवाखाना ते घर ही.
"आ, हसून झालाय न्हवं? आता बिगी बिगी चला, अंगुळीच पाणी काढलया. आन त्यो कापूर त्यो बी घातलया. दवाघर मंदी तुमचे प्याशंट बी लय अस्त्यात.जावा लवकर. न्हायंतर आता ताई आल्या तर मंग..." महादू हसू दाबत निर्वाणीचा म्हणाला.

"तुझ्या ताई साहेब? नको रे बाबा त्यापेक्षा मी गुमान, बिगिबिगी जातो" आणि आपला धोतराचा सोगा आवरत ते न्हाणी घरात पळाले.
महादू हसून मागे वळला. तर चौसोपी छोट्याश्या प्रांगणात ताईसाहेब होत्या. त्यांना पाहून अदबीने झुकला. ताईसाहेब म्हणजे ताईसाहेबच. इन मिन पाच फूट उंची, करारी नजर, सावळा वर्ण, किरमिजी म्हणजे मरून रंगाची आणि निळ्या काठांची इरकली साडी. जाडजूड केसांचा अंबाडा. त्याभोवती दारातल्या मोगऱ्याचा गजरा.
गळ्यात सोन्याची ठसठशीत वाटी असलेलं डोरलं, आणि काळ्या मण्यांची जाड पोत ते डोरलं. त्यांच्या करारी डोळ्यांना ते उठून दिसत होतं.
तुळशी पुढे निराळ्याच वासाची जणू इहलोकी अस्तित्वात नसावी अशी सुगंधी धुपस्टिक लावली होती ताई साहेबांनी. एक तेजस्वी दीप तुळशीपाशी शुभाची ऊर्जा जपत तेवला होता. आणि ताईसाहेब....!
सात्विक, पवित्र, आशादायी, सुंदर..ईश्वरी.

नजाकतीने आणि शांत चालत, पडविजवळ जाणाऱ्या तीन पायऱ्या चढून ताईसाहेब अदबीने उभ्या असलेल्या महादू बाजूला उभ्या ठाकल्या. महादूच्या डोळ्यात अनन्य आदरभाव दाटला होता. साक्षात तुळस बाजूला उभी.

"महादू ए महादू, अरे कुठं तंद्री लागली बाबा? तुझे साहेब स्नानासाठी गेले की नाही? मी दिलेलं पाणी दिलंस ना अंघोळीला?"  ताईसाहेबांनी महादूची तंद्री भंग केली.

"व्ह, व्हय व्हय तैसाब, महादू उद्गारला, समद आक्षी तसंच केलंया बगा, आन त्यो काचेचा गिलास, तेच्या मंदी तुमि दिलेलं पानी बी हाय! त्येसनी पियाला लावलाय म्या!"

महादू  क्लिनिक उघडायला किल्ली घेऊन आणि ताईसाहेबांचा निरोप घेऊन निघाला. तैसाहेबांनी आज इडली चटणी भरपेट खिलवली होती. त्याची चव झणझणीत ठेचा आणि भाकरी यावर पोसलेल्या महादूच्या दृष्टीने अत्यंत सौम्य. पण तैसाहेबांच्या हाताला चव तशी होती. पाणीही गोड लागावं.

"ईश्वरी, तुम और कितना अच्छा बरताव करोगी भई? अग माझ्या पोटावर पाय देशील ना? तुझ्या या सात्विक आस्थेने माणसे अर्धी ,अर्धी काय पूर्ण बरी होतील हं!"
टॉवेल ने आपलें ओले केस घसा घसा पुसत डॉक्टर मिश्कीलपणे म्हणाले.
तैसाहेबांचें नाव ईश्वरी! तैसाहेबांनी लटक्या रागाने मागे वळून पाहिले, माजघरातल्या बाथरूम मध्ये सचैल स्नान केल्यावर शुभ्र सदरा आणि धोतर या पोशाखात डॉक्टर अगदी फ्रेश दिसत होते.

"नाश्ता करा पाहू, बायकोची मस्करी करताय होय? महादू दवाखान्यात गेलाय! आटपा लवकर, आज तुला जायचं आहे तिथे राम! " ईश्वरी डॉक्टरना म्हणाली.

डॉक्टर राम गंभीर झाले. आपल्या ओठावर हाताची मूठ पालथीघालून डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीत डोळे मिटून स्वस्थ बसले. ईश्वरी म्हणजे ताईसाहेब काय ते समजल्या.
आणि स्वयंपाकघरात पुढील कामे अटपण्यासाठी निघून गेल्या.

इकडे शमी फोन कडे पहात तशीच वाकडी मान करून डोक्याला हात लावून बसली होती. "अजून नाही आले डॉक्टर" असे क्षीण स्वरात म्हणाली. आजोबा काही हलत बोलत नव्हते."तुम्ही असे नाही जाऊ शकत, मला ते कागद तरी दाखवयचेत ओ"

हा शेवटचा ओssssssss इतका वाढला की ती जोराने किंचाळली. आssssssssईsssssss अचानक झटके आल्यासारखी जोरजोरात हलायला लागली. तिचे डोळे लाल आणि शरीर हिरवं व्हायला लागलं. अचानक हात फिरवायला लागली. हवेत काही विचित्र लिपीमधली अक्षरे उमटायला लागली. "मला ती स्क्रिप्ट पाहजे...."
स्टिक स्टिक स्टिक.....स्त्याव स्त्याव बीक बीक दोन हिरवी आणि लाल वलये आजोबाभोवतीच्या तेजोवळ्याभोवती नाचू लागली.
"म्हाताऱ्या कधीपर्यंत लपवून ठेवशील? मेलास तरी सोडणार नाही...उठ, उठ , तुझ्या मुळे अडलाय! त्या गंगीने बनवलेली ती बाटली, कुठे लपवलीस? एsssss
बोल ना!"
त्या वलयामधून आवाज येत होते.

इकडे डॉकटर राम क्लिनिक मध्ये आले. "महादू ,ईश्वरी यायचं म्हणतेय, पण मी तिला नाही सांगितलं. "
महादूने संमती दर्शक मान हलवली,"मी सांगेन त्या वेळेला तिला घेऊन ये. लक्षात ठेव, 1 मिन पेक्षा जास्त उशीर झाला मी इशारा दिल्यानंतर तर खेळ खतम होईल मितरा!"
आणि ते चूर्ण आणि त्या बाटलीतील पाणी विसरू नको..।

मंदिर वाडा मंदिर वाडा
सगळ्यांना गिळणार...
आधी अडवलेत
त्याचे फळ नक्की मिळणार

त्यांनाही शोधलंय
काहींना धरलाय..
आधी अडवलेत,
आता नक्की मरणार...

मंदिर वाडा मंदिर वाडा
आssआss

क्लिनिक भोवती कुणीतरी काठी आपटत गात होतं.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults