सरमिसळ एक भयंकारी रोमांच पर्व दुसरें...पाणावलेल्या कथा

Submitted by मुक्ता.... on 6 September, 2021 - 08:05

पाणावलेल्या कथा

माझे सरमिसळ पर्व एक अवश्य वाचावे अन्यथा या कथामालिकेची लिंक लागणार नाही.

गुलमोहराच्या फुलांचा जथ्थाचा जथ्था पश्चिमेवर दाटला असावा असा भारी रंग आज तिथे रंगला होता. आजोबांच्या गोऱ्या सुरकूतलेल्या चर्येवर निर्विकार भाव होते. डोळ्यांत तेव्हढे पश्चिम क्षितिजावरचे सूर्यबिंब जमा झाले होते. नाही म्हणायला ओठांवर मिशीच्या आडून थोडे पिवळे हसू उमटले होते. अगदी थोडे, फक्त त्यांना कळेल एव्हढेच. बाकी मात्र ते कुणालाही निर्विकार आणि एकटक असे मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत आहेत असेच वाटावे.

त्यांचे असे एकटक बघणे हे फक्त एका व्यक्तीला तसे वाटत नसे. त्यांच्या बायकोला, शमीला! ती मात्र हे सूक्ष्म भाव सहज ओळखत असे. साधारण असं दिसलं म्हणजे हे लेखक महाशय काहीतरी गहन  विषयात बुडालेले आहेत आणि लवकरच एक नवीन कथा जन्म घेणार हे शमीला कळत असे. त्यात जर व्यत्यय आला तर काय होईल याची कल्पना तिला पुरेपूर होती. ती याचा आदर ठेवत त्यांना त्यांचा मोकळा वेळ देत असे.

आपल्या सुरकूतल्या थरथरत्या आवाजात "अहो...या आता, किती वेळ ?"शमी हाक मारत होती.
"दोन तास झाले हो दिनकरराव, या दुधवात करायची आहे ना?उठा आणि या बर… अहो.."

आजोबा हलेनात की काही बोलनात! काही हालचाल नव्हती. शमीने पुन्हा कातर आवाजात साद दिली.

"अहो..याहो, बघा हं, या वेळेला नाही आलात तर, मला माहितीये तुम्हाला त्या खिडकीपाशी कुणी म्हणजे कुणी आलेलं आवडत नाही ते, पण किती वाट बघायची एखाद्या माणसाची.चला दूध वातीचं राहू देत, गरम दूध खिचडी ,ती तरी खावी ना?"
दिनकार रावांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.

शमी आता मात्र त्यांच्या जवळ जायला लागली. आजोबांच्या खुर्चीच्या 6 फूट अंतरावर पोचली आणि साट्याक करून लांब ढकलली गेली...

"डॉक्टर बोलवायला हवे हो!ती वेळ आलीच परत "

स्टिक स्टिक स्टिक....काही नाही ही डायल टोन होती!!
शमीने नंबर दाबले...

पलीकडे दोन तीन वेळा रिंग वाजली, लगेच फोन उचलला गेला. आवाज आला ,"हालू, कोन बवलताय?"

"हा हा , महादू न तू?", शमी म्हणाली..
"व्हय व्हय , महादू बोलतु,तुमि कोन हायसा? कुटुन बोलतायसा?" महादू म्हणाला.
"मला नाही ओळखलं? मी शमी रे , मंदिर वाड्यातून बोलतीये"शमी आपुलकीने म्हणाली.

"म म मंदिर वाडा?"
ठप्प, महादू जागीच थरथरायला लागला. त्याने जवळजवळ फोन आपटलाच.

"इकडे येणार तो येणार....ही ही ही...31, 31, 31,31"

मोठ्या दिवाणखान्यात आवाज घुमला...
खरोखर कुणाचीही दातखिळी बसेल इतका भयानक ,काळीज चिरणारा आवाज होता तो!

इकडे महादू जरा पळत, धडपडत कसाबसा डॉक्टरांच्या घरी पोचला. जोराजोरात दरवाजा ठोठावायला लागला.

"डागतर आव डागतर उघडा व दार हुघडा. सांगावा आलाया तीतून तुम्हांसनी बोलिव्हलं हाय!"
क्षणाचंही अवसान न लावता महादू तो शिसवी दरवाजा ज्यावर अगदी वाड्याच्या दरवाज्यासारखे चौकट होते. आणि प्रत्येक चौरसात लाल, निळे ,पिवळे असे तारे कोरले होते. चंद्र ,सूर्य देखील होते.
महादूच्या हातातून रक्त यायला लागलं. इतके ते चिरा पडलेले तळवे त्याने दरवाजावर काही सेकंदाच्या अवधीत आपटले. महादूच्या मानेवरले केस कुणीतरी हातानी अलगद उडवावे, तशी एक झुळूक त्याच्या मागल्या बाजूने हळूच सरली. तो शांत झाला.

तो शिसवी दरवाजा करररर आवाज करत उघडला.
आतून एक घन गंभीर आशा एका स्त्रीचा आवाज आला.

" आत ये. आणि पाहिल्याने मलमपट्टी कर. तिथे प्रथमोपचार पेटी जिन्याच्या खालच्या बाजूला आहे. ती घे.नंतर तुझ्या रक्ताने माखलेली पायरी साफ धून काढ, महादू!"

डॉक्टर राहत असलेलं घर उंच जोत्यावर होतं.दगडी जोता. आणि त्याला 5 पायऱ्या होत्या. 3रया पायरीच्या खाली एक खण होता.  विशिष्ट कोड फिरवला असता तो उघडत असे. विशिष्ट क्रमाने हा कोड रोज बदलत असे. केवळ महादू हा त्या व्यक्तींपैकी होता जो ते जाणून होता.

महादू ने सगळे नीट केले.

आणि कोल्हापुरी वहाणा बाहेर ठेवून तो आत गेला.

महादू आत गेला.

थोड्या वेळाने हसत बाहेर आला.

डॉक्टरांचं घर म्हणजे अगदी साधं. गावातल्या लोकांनी स्वखर्चातून बांधलेलं. आडगाव ना, त्यामुळे इथे डॉक्टर्स यायला तयारच नसायचे. हे डॉक्टर कसेबसे लाभले. मात्र आपणहून आलेले.

शमी पुटपुटत होती काहीतरी हातात माळ घेऊन

"अहो येतील हो डॉक्टर.....!"

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

@श्रुती चव्हाण
सरमिसळ पर्व 1 चे 19 भाग आहेत, त्याला एक वर्ष झाले.
मी ते धागे देते इथे.
प्रतिसादासाठी धन्यवाद