हळूहळू आम्ही तिला विसरायला लागलो होतो.........

शापित स्त्री (भाग २)

Submitted by मिरिंडा on 26 July, 2021 - 06:06

    हळूहळू आम्ही तिला विसरायला लागलो होतो. तो रात्रीचा दिसायचा. आता त्याच्या चेहऱ्यावर मला प्रेतकळा आल्ये असं वाटू लागलं. मग एक दोन दिवसांनंतर तोही गायब झाला. आता तिच्या खोलीला कुलूप लागलं. मला सुटल्यासारखं वाटू लागलं. अचानक एका आठवड्यानंतर तिथे कोणीतरी राहत आहे असं वाटू लागलं. बहुतेक नवीन भाडेकरु आला असावा. अचानक एका रात्री नेहमीसारखी खिडकी उघडी दिसली. आज टीव्हीचा आवाज येत होता. सहज पाहिलं तर दोघेही एकमेकांजवळ बसले होते. तिची मान त्याच्या खांद्यावर होती. आणि तो तिचा चेहरा कुरवाळीत होता. आश्चर्याचा धक्का बसून मी अवाक् झालो. एरवी हिडीसफिडिस करणारा तो तिला कुरवाळत होता.

Subscribe to RSS - हळूहळू आम्ही तिला विसरायला लागलो होतो.........