शापित स्त्री (भाग २)

Submitted by मिरिंडा on 26 July, 2021 - 06:06

    हळूहळू आम्ही तिला विसरायला लागलो होतो. तो रात्रीचा दिसायचा. आता त्याच्या चेहऱ्यावर मला प्रेतकळा आल्ये असं वाटू लागलं. मग एक दोन दिवसांनंतर तोही गायब झाला. आता तिच्या खोलीला कुलूप लागलं. मला सुटल्यासारखं वाटू लागलं. अचानक एका आठवड्यानंतर तिथे कोणीतरी राहत आहे असं वाटू लागलं. बहुतेक नवीन भाडेकरु आला असावा. अचानक एका रात्री नेहमीसारखी खिडकी उघडी दिसली. आज टीव्हीचा आवाज येत होता. सहज पाहिलं तर दोघेही एकमेकांजवळ बसले होते. तिची मान त्याच्या खांद्यावर होती. आणि तो तिचा चेहरा कुरवाळीत होता. आश्चर्याचा धक्का बसून मी अवाक् झालो. एरवी हिडीसफिडिस करणारा तो तिला कुरवाळत होता. मी तसाच माझ्या खोलीत शिरलो. विशाखा झोपली होती . तिला न उठवता मी जेऊन घेतलं. मला हे झालं कसं ते समजेना. फार उशिरा झोप लागली. पुढे काहीतरी खळबळजनक घडेल अशी अपेक्षा असलेल्या माझी निराशाच झाली. मी रोजच ठराविक वेळी उघड्या खिडकीतून पाहत असे. पण सध्यातरी त्यांच्यात दिलजमाई झालेली दिसत होती......
आणि अचानक एक दिवस एक उंचेपुरे ,गोरे आणि हॅट घातलेले गृहस्थ आले. त्यांच्याबरोबर मागे आलेले आजोबाही होते. आजोबांना मी ओळखलं ते तिचे वडील होते. हे कोण नवीन गिर्हाईक ? की आणखिन कोणी ? मला कळेना. पण ज्याअर्थी आजोबा बरोबर आहेत त्याअर्थी गिर्हाईक नक्कीच नव्हतं.आत काय चाललंय इकडे लक्ष ठेवायला मी विशाखाला सांगितलं.पण नंतर विचार केला आज दांडीच मारावी.काहीतरी नवीन सापडेल. मग सुपरवायझरला फोन केला आणि तब्बेत ठीक नसल्याचं सांगितलं.
               दरवाज्याची कडी वाजली लवकरच दरवाज्या उघडला. " अरे, बाबा तुम्ही ? " ती बाजूला होत म्हणाली.
दरवाज्या लागला. मी पटकन दरवाज्याशी कान लावून उभा राहिलो. संवाद अर्धवट समजत होतें. तिचे बाबा म्हणाले, " यांना ओळखलंस का "  यापुढचं मला काहीच ऐकू आलं नाही. ते आतल्या खोलीत गेले असावेत . किंवा अतिशय हळू आवाजात बोलत असावेत. म्हणून मी खाली वाकून उघड्या खिडकीच्या पलीकडे भिंतीला चिकटून उभा राहिलो. आता बोलणं स्पष्ट समजते होतं. पण दिवस असल्याने आत पाहता येत नव्हतं. तिचे बाबा आणि तो माणूस हॅट काढून मला पाठमोरे बसले होते. ती मात्र समोर उभी होती. तिचे डोळे डबडबले असावेत . ती थरथरत्या आवाजात म्हणाली, " तीन चार वर्ष झाली सर . कितीतरी पत्र आणि फोन केले पण उत्तरच दिलं नाहीत.‌" . ती सर का म्हणत होता  मला कळेना. आता तो सर का कोण होता तो म्हणाला, " मी तुला घेऊन जायला आलोय. एकत्र आल्यावर सगळं बोलता येईल. " असं म्हणून त्याने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला. पण ती बाजूला होत म्हणाली, " आई बाबाना किती त्रास झाला कल्पना नाही तुम्हाला "  ....... मग ती पदराने डोळे पुशीत राहिली.त्या माणसाला काणकोणल्या  सारखं झालं असावं. काही वेळ रडण्यात गेला. ती म्हणाली, " किती त्रासाने आणि लपून अर्चनाला जन्म दिला. ...."  मग तिचे बाबा मधेच म्हणाले, " अंग हो पण ते अर्चूला घेऊन गेले तर काय हरकत आहे ? " त्यावर उत्तेजित होत ती म्हणाली, " अजिबात नाही . वाढवीन मी तिला. आणि माझं लग्नही झालंय आता. " परत बाबा म्हणाले ," म्हणूनच तर अर्चूला घेऊन जाऊ दे. म्हणजे तुलाही नीट संसार करता येईल. "  मग तो म्हणाला," मला तर दोघीही हव्येत. आता मात्र ती निक्षून म्हणाली, " नाही नाही, मी असलं काही करणार नाही. मी माझ्या नवऱ्याला समजावीन...... "   तिला आणखीनही काही बोलायचं असावं पण ती आतल्या खोलीत निघून गेली. मग तो माणूस वडिलांना म्हणाला, " समजावा तिला. मी अजून पंधरा-वीस दिवस इथेच आहे.  मी दोघींना घेऊन जाईन. शेवटी दोघीही माझी जबाबदारीच आहेत.  का ही एवढा आटापिटा करतेय? " ..... बाबा काहीच बोलले नाहीत. .... ते आत गेले. पण ती ऐकायला तयार नव्हती. मग तो माणूस म्हणाला, " मला खूप आशा होती. तिच्यावर झालेल्या अन्याय मला नाहीसा करायचाय. मी सुद्धा तिच्यासाठी थांबलोय."...... आता त्याचा गळा भरुन आला होता. ........असाच काही वेळ घालवून तो म्हणाला, " आपण निघायचं का ?.... समजावा हो तिला. मी पुन्हा येईन. " ... मग बाहेर येत ती म्हणाली ," निघा तुम्ही. बाबा थांबतील थोडा वेळ. ". असं म्हंटल्यावर तो उठला. आणि दरवाज्या उघडून डोळे पुसत बाहेर पडला. त्याने मागे वळून पाहिलं नाही. आणि पाहिलं असतं तरी मी दिसलो नसतो. मी भिंतीला घोरपडी सारखा चिकटून उभा होतो. आता कथा संपली होती. विशाखाशी चर्चा करण्यात इतपत मला माहिती मिळाली होती. दरवाज्या अर्धवट उघडा होता. मी पुन्हा खाली वाकून माझ्या घरी गेलो.
      बाबांनी दरवाज्या बंद केला.मग ते मालतीच्या जवळ येऊन तिला जवळ घेत म्हणाले," मला अजूनही वाटतं तू प्रोफेसर साहेबांच्या म्हणण्याचा विचार करावास. भावनेच्या भरात एकदम नाही म्हणू नकोस. तुझं लग्न लावलं, ही त्या वेळची गरज होती. प्रोफेसर साहेब मधेच येतील असं कधी वाटलं नाही. ". तिचं समाधान झालेलं दिसलं नाही. थोडावेळ इकडे तिकडे करून बाबा म्हणाले," चल, मी निघतो. काळजी घे. "......त्यावर ती काळजीने म्हणाली, " आज अगदी काही न घेताच निघालात. " ...... बाबा उठले कपडे नीट करीत म्हणाले," तुझं सगळं नीट झालं की मग जेवायलाच येईन." असं म्हणून तिच्या डोक्यावरून आणि पाठीवरून  त्यांनी हात फिरवला.  त्यांनी दार उघडलं. ते बाहेर पडले. मी त्यांना जाताना पाहिलं. दुपारचे चार वाजले होते. उगाचंच दांडी मारली असं वाटायला लागलं. आता मात्र मी शेजारणी कडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं. विशाखाला सांगितल्यावर ती म्हणाली, " तुमचा निश्चय, पाहू किती टिकतोय ते. " बायकांना नवऱ्याची रेवडी उडवण्याची संवय असते की काय कोण जाणे. मी माझं बोलणं गांभिर्याने घेतलं. मी रात्री फ्रेश होऊन येताना उघड्या खिडकीतून पाहीनासा‌ झालो. दोन चार दिवस निग्रहाने गेले. विशाखा मला ओठांच्या कोपऱ्यातून हासल्यासारखी वाटल्याने मी तिला सुनावलं. .....सात आठ दिवस मी लक्ष दिलंच नाही. ज्याअर्थी शेजारणीचं नवऱ्याशी जमत होतं त्याअर्थी आता त्यात रस घेणं सोडलेलं  बरं असं वाटू लागलं. मग एक दिवस मध्यरात्री नंतर दोघेही बाहेर जाताना दिसले. मला आश्चर्य वाटलं. पण ती त्यांची खाजगी गोष्ट आहे असं समजून मी दुर्लक्ष केलं.  मला झोप लागायला आणि पुन्हा ते दोघेही घरी यायला एकच गांठ पडली. तरीही मी पडून राहिलो. हळूहळू माझी झोप चाळवत चाळवत नाहीशी झाली. त्या दोघांबरोबर तिसरा ही आवाज आला. तो पुरुषी आवाज होता. मग दोन-चार फाटफाट मारल्यासारखे आवाज आले. मी उठून बसलो. घड्याळात चार वाजत होते. विशाखाचा घोरण्याचा आवाज येत होता. मधेच दबक्या आवाजात हुंदक्यांचा आवाज येऊ लागला. मी दरवाज्या किलकिला केला. नवरा मोठमोठ्याने शिव्या देत होता.. " साली, आहेस रांड ! आणि  पतिव्रतेचा आव आणतेस. त्याच्याजवळ झोपायला काय प्रॉब्लेम आहे ? " ..... त्यावर ती ठामपणे म्हणाली, " मी नाही झोपणार त्याच्याजवळ. मागच्याच आठवड्यात आपण एक झालो आहोत  असं म्हणालात ना ?, मग हे काय ? ".... त्यावर तो करवादून म्हणाला " थोडी सहानुभूती काय दाखवली  लगेच भाळलीस ? बायका मूर्ख असतात हेच खरं. मुकाट्याने कपडे काढून आतल्या खोलीत जा. तो वाट पाहतोय. चार पैसे तरी मिळतील. कंपनी बंद पडत्ये सांगितलं होतं ना ? " असं म्हणून त्याने तिला आतल्या खोलीत ढकलली. आणि दरवाज्या बाहेरुन बंद केला. ......काही वेळ तो आतले आवाज ऐकत उभा राहिला. .........
           ती अर्धनग्न अवस्थेत त्यातल्या त्यात हाताने शरीर झांकून उभी होती. तो हळूहळू जवळ आला. तो स्पर्श करणार तेवढ्यात तिने घाबरून डोळे मिटून घेतले. मग तिच्या खांद्यावर हात ठेवीत तो थंडपणे म्हणाला, " घाबरु नकोस .  मी तसलं काही करणार नाही. कारण, मी पुरुष नाही. मला मूल नाही. त्यामुळे बायको दुसऱ्याबरोबर निघून गेली. "  त्यांचा आवाज कातर झाला. तो पुन्हा आतल्या खुर्चीवर खाली मान घालून  बसला. तिने त्याच्या समोरच पुन्हा कपडे परिधान केले. तिला त्याची दया आली. मग तो तिला म्हणाला," साहेबांनी मला ,चल घरी . मजा येईल म्हणून सांगितलं. त्यांना माझ्याबद्दल माहिती नव्हती. खरोखरी मनापासून धंदा करीत असतात तरी पोलिसांकरवी सुटका केली असती. पण नवराच असं करायला सांगतोय म्हंटल्यावर काय बोलणार ? तरीही प्रयत्न करीन. ". ....मग त्याने खिशातून हजार रुपये काढून तिच्यासमोर धरले . म्हणाला, " हे‌ घ्या . नाही घेतलेत तर त्याला संशय येईल. नाही म्हणू नका. तिने पैसे घेतले. तो उठला आणि दरवाज्या वाजवू लागला.

            दरवाज्या उघडला. तो बाहेर गेला. नवऱ्याने त्याला विचारलं," झालं ? " त्याने मानेनेच होकार दिला.  पुढचा दरवाज्या उघडून तो पुन्हा मागे न बघता भराभर निघून पण गेला. जणू त्याला परत कोणी बोलवील की काय. नवऱ्याने मागे वळून तिच्याकडे संशयाने पाहिलं. त्याची नजर तिच्या चेहऱ्याचा वेध घेत होती. हिनी काही तरी लबाडी केली असावी. तो पुढे काही बोलण्या आधीच तिने पाचशेच्या दोन नोटा त्याच्या हातात दिल्या. ती खाली मान घालून बिछान्याकडे वळली. आता त्याने न राहवून विचारलं, " फार लवकर झालं वाटतं. ?" त्यावर त्याच्याकडे पाठ करीत ती म्हणाली ," त्याला फक्त पाहायचं होतं....."   ती थबकली . अचानक आपल्याला सुचलेल्या उत्तराचं  तिला आश्चर्य वाटलं.  त्याच्या डोळ्यांकडे न पाहता तिने पांघरुण अंगभर ओढून घेतले. लाईट मालवून तोही लवंडला. पण मनात संशय ठेवूनच........
.......मीही गाढ झोपेत असल्याने मला काही समजण्याचा प्रश्नच नव्हता. सकाळचे नऊ वाजले . मला विशाखानी हालवून उठवलं. माझा चहा होईपर्यंत तिनी काहीच विचारलं नाही. मग मात्र म्हणाली," निश्चय संपला वाटतं. !" मी मुद्दामच उत्तर दिलं नाही. मला वाद नको होता. मी काहीच बोलत नाही असं पाहून ती माघार घेत म्हणाली, " भाजी घेऊन या. डबा देता येईल."  मी जास्त चर्चा नको म्हणून कपडे घालून बाहेर निघालो. मग रचना मागे लागली म्हणून तिला घेऊन बाहेर पडलो. बाजार उरकून मी घरी आलो. गेटवरच पोलिस हवालदारानी अडवलं. ," तुम्ही याच चाळीत राहता ना ? ( मी होकारार्थी मान हलवली) त्यावर त्यांनी मला विचारलं, " कोणती खोली तुमची ? " मी हातानीच आमची खोली दाखवली. ते पाहून त्यांनी विचारलं, " तुमच्या शेजारच्याच खोलीत धंदा चालतो माहिती असेलच तुम्हाला ?  "मी नाही" म्हंटलं त्यावर ते म्हणाले ," काय राव काय बोलता ? शेजारच्या खोलीत धंदा चालतो आणि तुम्हाला माहिती नाही ? कोण विश्वास ठेवील ? ". ....मी वैतागून विचारलं ," मला कसं माहित असणार ? मला रोज रात्रपाळी असते. तुम्ही थेट त्यांनाच विचारा की. ".....त्यावर त्यांच्याकडे जाणारच आहे असं ते  म्हणाले.
ते माझ्याकडे टक लावून पाहत होते. मग मी खोलीकडे निघालो. तेही माझ्या मागोमाग आले. मला वाटलं ते घरी येऊन विशाखाला विचारतील. पण तसं न करता त्यांनी शेजारणीच्या दाराची कडी जोरात वाजवली. विशाखानी दार उघडल्यावर घाईगर्दीने आत शिरुन मी  दरवाज्या लावून घेतला. विशाखाऩी काय झालंय ते विचारलं. मी पोलिस चौकशी करतायत असं सांगितलं. " ..."होय. पण आपला काय संबंध. ". ...."तेच तर मी सांगितलं त्यांना. पण आपल्याला माहीत नाही यावर ते विश्वासच ठेवीत नाहीत. " ........
        शेजारणीच्या नवऱ्याने जांभया देत दरवाज्या उघडला. दरवाज्यात हवालदाराला पाहून त्याची झोप उडाली. " क..क..काय पाहिजे ?" त्याने चाचरत विचारलं. आतमध्ये नजर फिरवित आणि स्त्रीचे काढलेले कपडे पाहून  हवालदार म्हणाले ," पवार इथंच राहतात का ? " . .... " इथे पवार राहत नाहीत. आणखी चपळाईने नवऱ्याने दरवाज्या लावून घेतला. हवालदार काही तरी मनाशी ठरवीत निघून गेले. माझ्या मनात आलं, मला उगाचच उलटेसुलटे प्रश्न विचारले. पुन्हा दोन-चार दिवस गेले. काहीच घडत नव्हतं. मला स्फोटाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात साधा फटाकाही फुटत नव्हता......अचानक एक दिवस दुपारी अडीच तीन च्या सुमारास  माझी कामाला जाण्याची वेळ असताना एक जाडजूड, उंच,धिप्पाड ,  रुंद चेहऱ्याचा,मोठाले डोळे आणि मोठे नाक असलेला ,जाडसर मिशी ठेवलेला माणूस पान चघळीत शेजारणी कडे आला. बेल वाजवली. दरवाज्या उघडून तिने विचारलं, " कोण पाहिजे ?" त्याच्या दारुच्या भपक्याने तिने तोंडावर हात ठेवला होता. त्याबरोबर काही न बोलता तिला हाताने ओढून त्याने उचलले व तो भराभर पावले टाकत गेटजवळ उभ्या असलेल्या मारुती व्हॅनमध्ये तिच्यासहीत आत बसला. हे सगळं विजेच्या वेगाने झाल्याने पाहणाऱ्या मला आणि विशाखाला पाहत राहण्याशिवाय काहीच करता आले नाही. मी रात्रपाळी करिता निघत होतो.  पोलिसात तक्रार करण्याचं धैर्य मला झालं नाही. तिच्या नवऱ्याला सांगितल्याशिवाय तसं करणं बरं नव्हतं म्हणा किंवा मी तरी त्यावेळेला तशी सबब शोधून स्वस्थ राहिलो. आता मात्र मी भानगड नको म्हणून इमानदारीने कामावर गेलो. माझ्या डोक्यातून तो प्रसंग गेला नाही. रात्री मी घरी आल्यावर उशिरा का होईना तिच्या नवऱ्याला भेटण्याचं ठरवलं.विशाखाला लक्ष ठेवायला सांगून मी कामावर जायला निघालो. शेजारणीचा पुढचा दरवाजा सताड उघडा होता. दारात उभ्या असलेल्या विशाखाला मी आपण तिचा दरवाज्या लावून घ्यायचा का असं विचारलं. त्यावर तिने नापसंती दर्शवली. मी तिला पटवण्याच्या भानगडीत पडलो नाही. मी गेल्यावर ती आत गेली. माझ्या मनात आलं रात्री नवरा घरी आल्यावर त्याला बायको घरात नाही हे पाहून काय वाटेल,असा विचार करून मी मागे वळलो. नशीब विशाखानी आमच्या खोलीचा दरवाज्या लावला ह़ोता. मी हळूच जाऊन शेजारणीचा दरवाज्या बाहेरून कडी न लावताच लोटून घेतला. आणि मी कामावर गेलो. कामात असताना माझ्या मनात आपण हा आगाऊपणा का केला असं वाटत राहिलं. संडासला जाणाऱ्या प्रत्येकाने आत डोकावून पाहिलंच असतं.............
           
        ... .. मारुती व्हॅन जोरात चालली होती. मालतीनी सुटकेसाठी जोरदार प्रयत्न केला. पण त्याची पकड जबरदस्त होती.आता त्यानी तिच्या दोन कानफटात मारल्या .ती दरवाज्याकडे वळली. पळवलं जाण्यापेक्षा दार उघडून जीव गेला तरी चालेल. या कल्पनेने तिने प्रयत्न चालवला. पण दरवाज्या लॉक होता. चपळाईने त्याने तिच्या गळ्याभोवती पकड मिळवली. ती सुटकेसाठी तडफडू लागली. दुसऱ्या हाताने त्याने कुरत्यातली क्लोरोफॉर्मची बाटली काढली. रुमालावर ओतणार तेवढ्यात तिनी इतक्या जोरात धक्का दिला की ,बाटली त्यांच्या हातातून उडून खिडकीवर आपटली आणि सगळा क्लोरोफॉर्म गाडीत सांडला. त्याचा वास वाढून सगळ्यांवर परिणाम होऊ नये म्हणून ,  " रेहमान गाडी साईडमे ले....साली रंडी मानती नहीं "  त्यानी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. पण रेहमान म्हणाला, " गाडी बाजूने लेना आसान नहीं है भाईजान..." त्यावर तो म्हणाला, " भोसडिके, रोक दे गाडी. नहीं तो पहिले तुझे उडा दूंगा, " खिशातलं पिस्तूल काढीत जावेद ओरडला.. आता मात्र रेहमानने गाडीचा वेग कमी करीत आडरस्त्याला नेऊन उभी केली. ते होतं,, गोरेगावचं
"जं  ग  ल ." आता दुपारचे चार वाजत होते. हळूहळू पावसाला सुरुवात झाली. जावेदने तिला  दरवाज्या बाहेर ढकलली. ती वेडीवाकडी पडली. परंतू स्वतःला सावरीत ती वाट फुटेल तिकडे पळत सुटली. पावसामुळे दिसण्यात अडथळे येत होते. तोंडावरचं पाणी झटकीत रस्ता पाहावा लागत होता. तिलाही आणि त्या दोघांनाही. ....जावेद आणि रेहमान गाडी तशीच टाकून तिच्यामागे पळत सुटले. पावसाला उधाण आलं होतं.तिला ओल्या साडीने आणि अंगाला घट्ट बसलेल्या आंतर वस्त्रांमुळे नीटपणे धावता येइना. ती ठेचकाळत धावत होती. ते दोघेही दैत्यांसारखे तिच्या मागे धावत होते. आता जंगल दाट होत चाललं होतं. ती वेगवेगळे ओढे ओलांडीत धावत होती. अचानक तिच्यासमोर एकमेकांना चिकटलेले दोन वृक्ष आले. त्यांच्या खोडात ढोलीसारखा एक माणूस सामावून घेईल असा भाग होता. ती त्यात लपली. धडधडत्या उरावर तिने हात ठेवला. जणू काही उराचं धडधडणं थांबलं असतं.ते दोघेही तिच्या अचानक नाहीसे होण्यामुळे निराश झाले. त्यांचे कपडे चिखलाने माखले होते. इकडे तिकडे फिरुन तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती न सापडल्याने जावेद रेहमानला म्हणाला, " अब मौसीको कैसे पेश आऊं..." समोरच्या ओढ्यात हातपाय धुऊन ते कुठे शोधणार याचा विचार करीत राहिले. शोधण्यात त्यांचा अर्धा पाऊण तास गेला.आता थोडी मालती स्वस्थ झाली. वेगवेगळ्या प्रकारे तिचे आंबलेलं अंग ठणकू लागलं. मग तिच्या पायाच्या अंगठ्याला लागलेल्या ठेचेमुळे येणारे रक्त थांबून गोठले होते. अभावितपणे तिच्या तोंडून " आई ग!..." असे शब्द निघाले......निराशेने थांबलेल्या त्याच्या  कानावर शब्द पडल्यावर त्याने आवाजाच्या दिशेने मान वळवली. आणि आश्चर्य चकित  होऊन त्याला तिचा पाय दिसला .तो स्वतःशीच म्हणाला, " या अल्ला . रेहमान मिल गयी देख. " झपाट्याने पुढे होऊन त्याने तिला ढोलीतून ओढून काढली. त्याबरोबर ती त्याच्या हाताला चावली. तो वेदनेने कळवळला पण तिला न सोडता तिच्या कानफटात मारुन तिला खाली पाडली. मग  तो म्हणाला, " साली, तू ऐसी नहीं मानेगी ". असं म्हणून त्याने तिची साडी ओढून काढली. आता त्याने तिची इतर वस्त्रेही ओढून काढली. आणि तिचे हात पकडून  स्वतःचे कपडे अर्धवट काढून तिच्यावर स्वार झाला. त्याचे पावसाने भिजलेले आणि दारुचा भपका येणारे  तोंड त्याने तिच्या तोंडात घुसवले.......त्या घाणीने आणि थकव्याने तिची शुद्ध हरपली.थोड्याच वेळात आपली वासना त्याने पूर्ण केली. तिच्या शरीराचे लचके तोडण्याचेच बाकी होतं. तो उठला. आणि स्वतःचे कपडे ठाकठीक करीत त्याने तोंड फिरवून उभ्या असलेल्या रेहमानला सांगितले, " तू भी मजा कर ले. " पण रेहमान म्हणाला ," नहीं भाईजान मुझे गाडी चलानी है. " रेहमानला हे आवडलं नाही पण भाईजान पुढे तो कसं बोलणार . नाही म्हंटलं तरी भाईजान मोसीच्या मर्जीतला माणूस होता. मग ती हालत नाही असं पाहून ती मेली तर नाही या शंकेने जावेदने तिला उचलली.तिचा श्वास चालू असल्याचे त्याला जाणवून तो स्वस्थ झाला. मग ते तिला घेऊन गाडीकडे निघाले. पाच वाजून गेले होते. ग्रांटरोडला पोहोचेपर्यंत आठ सहज वाजतील असं त्याच्या मनात आलं. उन्हं उतरली होती.पावसाची आता रिपरिप सुरू होती. तेवढ्यात त्यांना गाडी दिसली. गाडीचे दरवाजे उघडे पाहून तो रेहमानवर भडकला.," क्यूं बे, तेरी अकल घास खाने गयी क्या. गाडी खूली छोड दी तूने ? तेरेको बादमे देखता हूं. "  तरुण रेहमान घाबरून म्हणाला, " गलती हो गयी भाईजान . फिर ऐसा नहीं होगा .माफ कीजिये......"   गाडीत शिरल्या शिरल्या त्याने मालतीचे हातपाय बांधले. तिच्या तोंडावर पाणी मारले. ती शुद्धीवर आली.
     तिच्या तोंडात पाणी घालीत तो म्हणाला, " अब भाग जितना भागना है. " त्यावर ती काही न बोलता रडत राहिली. गाडी भरधाव चालू लागली. रात्र चढत होती. तिला दिवसभरच्या श्रमानी आणि उपाशी पोटानी ग्लानी आली. उगाच पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून गाडी शक्यतोवर आडमार्गाने काढीत होते. तरीही गाडी आठच्या सुमारास ग्रांटरोडजवळ आल्यावर नेमकी पोलिसांनी थांबवली. कोणीतरी गुन्हेगार पळाल्याची खबर लागल्याने तपासणी चालू होती. पो .इन्स्पे आणि दोन कॉन्स्टेबल्स यांनी गाडीभोवती फिरुन डिकीसहीत तपासली. तिचे बांधलेले हात जावेदने तिच्या पदराने चपळाईने झाकले.  जवळील टॉर्चच्या प्रकाशात पोलिसांनी आत झोपलेल्या मालतीबद्दल विचारलं, " या बाई का झोपल्येत ? " रेहमानला मराठी येत असल्याने तो म्हणाला ," अवो  सायेबब दिवसभर प्रवासात असल्यानी त्यांना झोप आली, त्याला काय करणार ? "  ....." ठीक आहे निघा " ...अस़े म्हंटल्यावर गाडी पुढे निघाली. लवकरच ते जमना मौसीच्या अड्ड्यावर दाखल झाले..........
(क्र म श:)

..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कायच्या काय स्टोरी आहे. इतका भोचक शेजारी? आणि त्याची बायकोपण एका दुसर्या बाईत नवरा एवढा इंटरेस्ट घेतोय तरी शांत आणि साथ देते?
सतत त्यांच्या घरी काय चाललंय हाच विचार आणि त्यासाठी कामाला दांड्यापण? ही एक विक्रृती असावी किंवा एखादा आजार.
मागे एक आफिसमधली पण अशीच कथा होती. कलीगचं काय चाललंय ते समजायला डिटेक्टीव वैगेरे. तुमचीच होती वाटतं.
सतत लपुन खिडकीतुन बघणं-ऐकणं आणि त्यावरून एवढी डिट्टेल माहिती मिळणं अचाट आहे.
मालतीला गाडीत घालून नेल्यानंतरचं सगळं लाइव्ह टेलिकास्ट शेजार्याला कसंकाय दिसलं?
शेजार्याला नॅरेटर न ठेवता जमली असती कथा असं वाटतंय.

सस्मित ना अनुमोदन.
या आयडी च्या जितक्या कथा आहेत त्या सर्वांमधे कथा सांगणारे पात्र अतिलंपट , परक्या स्त्रियांबद्दल अनावश्यक उत्सुकता असणारे आणि असभ्य वर्तन करणारे वाटले.
मग ती स्त्री सहकर्मचारी / प्रेयसीची बहिण असे कोणीही असो.
तसेच स्त्री शरीराचे अगदी अनावश्यक वर्णन असते.
फक्त हा प्रतिसाद देण्यासाठी या धाग्यावर आले. परत कधी हे धागे बघणार नाही.

सस्मित आणि धनवन्ती, अतिशय सहमत. मी ह्या टाईपचा प्रतिसाद लिहावा की नाही ह्यावर विचार करुन ‘जाऊ देत‘ म्हणत लिहिला नाही.
कथा काहीही आहे.

क्रमश: कथा सहसा वाचत नाही. पण वरचे प्रतिसाद बघून वाचली.
लेखणीत प्रसंग रंगवत कथा पुढे न्यायची क्षमता आहे. पण कथानक आणि वर्णन मात्र मायबोलीवरील वाचकवर्गाला रुचणार नाही असे आहे. त्यादृष्टीने काळजी घेतली तर ईथेही चांगला वाचकवर्ग मिळू शकतो. शुभेच्छा !

स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन क्वचितच निकोप असतो . माझ्या बहुतेक कथांमधे हेच दाखवायचा माझा प्रयत्न असतो. माझी लिखाणाची पद्धत अशी आहे खरी. परंतू सर्व प्रतिसाद पाहून मी कथा पाठवणे थांबवीत आहे ‌‌ . तरीही स्पष्ट प्रतिसादाबद्दल आभार. ही कथा डिलिट कशी करता येईल ते मात्र सांगा.

मिरिंडा, मला कथा आवडली नाही. कायच्या काय वाटली. तसं मी लिहिलं.
अशी माणसं असतात असं तुम्ही म्हणताय त्याला माझी ना नाही. कथेचा फाॅरमॅट बोर वाटला.
तुम्ही कथा पुर्ण करू शकता. वाचणारे वाचतील. लिहिणारे लिहितील. लेखनावर बरेवाईट प्रतिसाद येणारच.

सगळे बरे वाईट परिणाम अपेक्षित आहेत. ते वाचकांचं स्वातंत्र्य आहे. मी चांगलेच प्रतिसाद यावेत अशी अपेक्षा कधीच करीत नाही. लिहीण्यासारखं बरंच असलं तरी यापेक्षा जास्त मला लिहीता येत नाही.

सायो तुमच्या तुमच्या प्रतिसादाशी संपूर्ण सहमत.
मागे एक ताई म्हणून क्रमशः टाकलेली कथा होती ती खरंच मोठी रहस्यमय निघेल म्हणत नेटाने वाचली...... पण शेवट गुंडाळताना ओढाताण करून कायतरी रहस्य टाईप टाकलेले. त्या कथेला ताई या नावापेक्षा छाती हे नाव फिट्ट ठरलं असतं असं वाटलं इतका त्याचा अतिरेकी वापर होता.

एस
ताई ही कथा चालू असताना किंवा ती पूर्ण झाल्यावरही आपला कोणताही प्रतिसाद आला नाही याचं आश्चर्य वाटतं.

नवीन प्रतिसाद लिहा