देश विकल्या जाणार आहे.
Submitted by Pratik jagannat... on 30 September, 2020 - 15:59
विकासाच्या नावाखाली हा देश विकल्या जाणार आहे,
विकल्या आधीच कंपन्या सरकारी, आता शेतीवर खेळणार आहे.
गळा आवरून लोकशाहीचा हुकुमशाही येणार आहे;
शांत राहीलो आज तर उद्या गळा माझाही चिरणार आहे.
संसदेतील बिलांना आता दान असे मिळणार आहे,
चर्चेच्या ओढ्यातून सुटका, रातीत त्याची होणार आहे.
जुन्या मंड्या, अडती-चोर, सारेच आता उठणार आहे;
दलाल होईल बेरोजगार जुने, अन दलाल नवे येणार आहे.
पुन्हा स्वप्ने समृद्धीची बघ डोळ्यात ते रंगवणार आहे.
पण चेहेरे लावून आधुनिकतेचे, जमीनदार मुघली येणार आहे.
शब्दखुणा: