देश विकल्या जाणार आहे.

Submitted by Pratik jagannat... on 30 September, 2020 - 15:59

विकासाच्या नावाखाली हा देश विकल्या जाणार आहे,
विकल्या आधीच कंपन्या सरकारी, आता शेतीवर खेळणार आहे.

गळा आवरून लोकशाहीचा हुकुमशाही येणार आहे;
शांत राहीलो आज तर उद्या गळा माझाही चिरणार आहे.

संसदेतील बिलांना आता दान असे मिळणार आहे,
चर्चेच्या ओढ्यातून सुटका, रातीत त्याची होणार आहे.

जुन्या मंड्या, अडती-चोर, सारेच आता उठणार आहे;
दलाल होईल बेरोजगार जुने, अन दलाल नवे येणार आहे.

पुन्हा स्वप्ने समृद्धीची बघ डोळ्यात ते रंगवणार आहे.
पण चेहेरे लावून आधुनिकतेचे, जमीनदार मुघली येणार आहे.

फेल मॉडेल पाश्चिमात्यांच देशात नव राबणार आहे,
विचार शेतकर्‍याच्या स्वातंत्र्याचा अशा प्रकारे होणार आहे.

विकासाच्या नावाखाली हा देश विकल्या जाणार आहे,
विकल्या आधीच कंपन्या सरकारी, आता शेतीवर खेळणार आहे...

प्रतिक वंदना वानखडे
7447738567

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आमच्या पार्टीत सहर्ष स्वागत

फेल मॉडेल पाश्चिमात्यांच देशात नव राबणार आहे,
विचार शेतकर्‍याच्या स्वातंत्र्याचा अशा प्रकारे होणार आहे.

कळलं नाही. प्लीज एलॅबोरेट !!!!!

@taimur
देश विकल्या जाणार आहे. ईथे *विकल्या जाणार*आहे हा शब्द विदर्भातील वर्‍हाडी भाषेतील आहे. आणि मराठी भाषा ही शेकडो बोली भाषेत अस्तित्वात आहे. आणि ईथे विकल्या जाणार आहे हा एकवचनी अर्थाने घेतला आहे.

@James bond

नमस्कार दादा.

त्या ओळींचा अर्थ. सध्या नव्याने पारित झालेल्या संसदेतील विधेयकास पुढे ठेवून लिहिण्यात आला आहे. (यावर प्रत्येकाच मत वेगळ असू शकत.)

धन्यवाद..