प्रियकर

पत्नी, पती और वह।

Submitted by बिथोवन on 24 September, 2020 - 23:36

पत्नी, पती और "वह".

ऊँ ऊँ हूँ! सोड ना रे! किती डोळ्यात डोळा घालून बघतोस? इतकी आवडते मी तुला..? सोडतच नाहीस अगदी! सतत मला घेऊन बसतोयस तू..! मला पण तू आवडतोस रे... तुझा विरह सहन करणे म्हणजे शिक्षाच. मध्ये चार दिवस बरं नाही म्हणून गेलास तेंव्हा मी इतकी व्याकूळ झाले की काय सांगू तुला..! काय काय बडबडत होतास तापात आणि कसनुसा चेहरा करत होतास... आता अगदी हसत बघतोयस ते... आणि हाताची बोटं किती वेळ गुंतवशील? चल सोड आता.... स्वैपाक करायचा आहे मला... तो येईलच आता तासा दोन तासात. तुझ्याबरोबर बघितलं की माझं संपलच म्हणून समज. बरं बाबा, अजून थोडा वेळ हवाय..? बर.

Subscribe to RSS - प्रियकर