रिटायरमेंट

स्वावलंबन पेंशन योजना

Submitted by सख्या on 16 January, 2015 - 04:31

एक पोस्ट फिरतेय एफबी वर ह्या संदर्भात पण डीटेल माहीती नाही कुठेच. हे अकाउंट नकी कसे कुठे ओपन करायचे? कुणी हे खाते उघडले आहे का? हे सर्वांसाठी अ‍ॅप्लीकेबल आहे का? हाउस्वाईफचे अकाउंट काढता येते का? जाणकारांना विनंती की इथे माहीती शेअर करावी.

शब्दखुणा: 

नवीन पेन्शन योजना ( NPS- New Pension System )

Submitted by केदार on 27 January, 2011 - 17:04

भारत सरकारने काही वर्षांपूर्वी Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) ह्या संस्थेअंतर्गत नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. ही नवीन का? तर पूर्वी पेन्शन मधील रक्कम ही PF अकाउंट मधेच असायची आणि PF मॅनेजर्स ह्या बॅंकाच असल्यामुळे त्यावर साधारण दराने व्याज मिळायचे. थोडक्यात ते रिकरिंग फिक्स डिपॉझिट्स ह्या स्वरुपात असायचे. पण नवीन योजनेत मात्र ह्यातील रक्कम शेअर मार्केट मध्ये गुंतवली जाईल. थोडक्यात हे आता म्युच्युअल फंड च्या SIP सारखे असेल पण म्युच्युअल फंडासारखे कधीही पैसे मात्र काढता येणार नाहीत. ही योजना सर्वांना खुली असून ह्यात भाग घेणे हे ऐच्छिक आहे. (voluntary).

शब्दखुणा: 

एका डॉक्टरच्या कविता-३: रिटायरमेंट

Submitted by डॉ अशोक on 18 September, 2010 - 06:54

( थोड़ी प्रस्तावना: फ्यामिली डॉक्टरचा जमाना गेला, स्पेशालिस्टचा ज़माना आला. स्पेशालिस्टला काही संवयी असतात, त्या चिकटल्या की चिकटल्या. अशाच काही सवयी आणि त्यांचे हे किस्से, खरे नव्हे, पण खोटे तरी कसे म्हणू ? )

रिटायरमेंट

१. Orthopedician
साठाव्या वर्षी
शेवटचं ट्रयाक्शन लावून
ओर्थोपीडीशीअन घरी आला
दारातच पाय घसरून
वोर्डात परत गेला

२. फिजिशियन

फिजिशियन ची साठी आली
हातात काठी आली
अंगात कंप आला
डोळ्यात मोती आला
तरी सुद्धा आपल्या बधीर कानाला
त्यान स्टेथो लावला
आणि स्वत:चाच हार्ट-रेट मोजू लागला!

३. सर्जन

हजार अपेंडीक्स, सातशे हायड्रोसील
आणि पाचशे हर्निया करून

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रिटायरमेंट