नवीन पेन्शन योजना ( NPS- New Pension System )

Submitted by केदार on 27 January, 2011 - 17:04

भारत सरकारने काही वर्षांपूर्वी Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) ह्या संस्थेअंतर्गत नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. ही नवीन का? तर पूर्वी पेन्शन मधील रक्कम ही PF अकाउंट मधेच असायची आणि PF मॅनेजर्स ह्या बॅंकाच असल्यामुळे त्यावर साधारण दराने व्याज मिळायचे. थोडक्यात ते रिकरिंग फिक्स डिपॉझिट्स ह्या स्वरुपात असायचे. पण नवीन योजनेत मात्र ह्यातील रक्कम शेअर मार्केट मध्ये गुंतवली जाईल. थोडक्यात हे आता म्युच्युअल फंड च्या SIP सारखे असेल पण म्युच्युअल फंडासारखे कधीही पैसे मात्र काढता येणार नाहीत. ही योजना सर्वांना खुली असून ह्यात भाग घेणे हे ऐच्छिक आहे. (voluntary). पण प्रत्येक सेन्ट्रल गव्हर्न्मेंट नौकराला मात्र ही योजना बंधनकारक आहे.
योजना अशी काम करेल.
१. PFRDA संस्था बँकांना व पोस्ट ऑफिसना ही योजना चालवायला उद्युक्त करेन.
२. बँकेत जाऊन कोणीही (सरकारी, निम सरकारी, प्रायव्हेट, दुकानदार, व्यावसायिक इ इ) दोन प्रकारचे अकाउंट उघडू शकते. ( टियर १ आणि टियर २)
३. अकाउंट उघडल्यावर प्रत्येकाला त्याचा PRAN Happy (Permanent Retirement Account Number) मिळेल. नौकरी बदलली /सोडली तरी हा नंबर कायम राहील.
४. अकाउंट उघडल्यावर दरमहा धारक पैसे जमा करेल. ( दरमहा कमीत कमी ५०० रू टियर १ मध्ये तर १००० रू टियर २ रु ते कितीही).
५. धारकाला अकाउंट उघडतानाच फंड मॅनेजर निवडावा लागेल. उदा आयसिआयसिआय, रिलायन्स, आयडिएफसी, स्टेट बॅन्क इत्यादी )
६. धारकाचे पैसे वरील फंड शेअर बाजारात गुंतवतात.
७. टियर १ ही योजना कधीही बंद करता येते पण खात्यात पैसे मात्र वयाच्या ६० व्या वर्षीच मिळतील. त्या आधी काढता येत नाहीत.
८ टियर २ ही योजना कधीही बंद करता येते व पैसे उचलता येतात.
९ आपली रक्कम दुसर्‍या फंड मॅनेजरकडे वळवता येते.
१० साधी आणि सोपी योजना. म्युचवल फंडाचे फायचे पण फंड निवडायची कटकट नाही.
११. टियर १ मध्ये ६० वर्षानंतर ४० टक्के रक्कम ही विमा कंपनीत परत गुंतवावी लागते व उरलेली रक्कम एकरकमी उचलता येते.
१२. गुंतवणूक करण्यासाठी अ‍ॅटो (म्हणजे लाईफसायकल फंड) व अ‍ॅक्टीव चॉईस ( म्हणजे इक्वीटी, बॉन्ड इ इ) फंड उपलब्ध आहेत.

थोडक्यात ही योजना अमेरिकेच्या ४०१ के सारखी आहे, पण ४०१ के मध्ये आपली कंपनी पण रक्कम गुंतवते, इथे मात्र तसे नाही.

उदाहरणासाठी तुम्ही जर ५००० रु प्रतिमहिना असे २० वर्षे ह्या योजनेत दिले आणि साधारण फक्त ६ टक्के परतावा घेतला तर तुमच्याकडे २० वर्षानंतर ३५ लाख रू जमा असतील!

आयडीएकसीच्या E योजनेने आत्तापर्यंत स्थापने पासून ४१% परतावा दिला आहे तर त्याच कालावधीत निफ्टीने ३६%. अर्थात हा दिर्घ कालावधी असल्यामुळे मधील उच्चांकाच्या वेळी निफ्टीचा परतावा जास्त असेल पण पेन्शन फंड असल्यामुळे पैसे काढता आले नसतेच.

पेन्शन फंड म्हणून ही योजना मला खूप चांगली वाटत आहे.

.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार खुप आभार. एक्दम उपयोगी स्किम वाटतेय.
काही प्रश्न आहेत.
१. एन आर आय यात अकाउंट उघडु शकतात का?
२. भारतात बॅंकेत न जाता, ऑन्लाईन अकाउंट उघडता येईल का?
३. दर महिन्याचे पैसे पण असेच ऑनलाईन भरता येतील का?
४. दर महिन्याचे पैसे टाकायचे अप्पर लिमिट काय आहे?
५. काही कारणाने टियर १ ते २ किंवा २ ते १ अशी ट्रान्सफर केलेली चालते का?
६. अकाउंट होल्डरचा मृत्यु झाल्यास हि सगळी रक्कम नॉमिनीला मिळते का?

सध्या तरी इतकेच Proud

मस्त माहिती केदार , धन्यवाद , मलाही सावलीसारखेच प्रश्न आहेत. प्लस ,
७. दरमहिन्याऐवजी वर्षअखेर एकदम पैसे भरता येतील का ?

आयसिआयसिआय डायरेक्ट च्या वेबसाईट वर न्यु पेन्शन सिस्टीम मधे अप्लाय करता येईल असं लिहिलं आहे.
http://content.icicidirect.com/newsiteContent/ProductService/ProductServ...
माझं इथे अकाउंट नाही. कोणाच असेल आणि अप्लाय केलत तर सांगा.

१. एन आर आय यात अकाउंट उघडु शकतात का?
नाही. निवासी भारतीयांसाठी ही सोय आहे. (पण भारतात नेहमी साठी परत जायचे असेल, एखाद्या ट्रिप मध्ये हे करता येईल.
जर एखाद्याने हे अकाउंट उघडले असेल आणि तो कायमचा NRI होऊ इच्छित असेल तर आपोआप हे अकाउंट बंद होईल व ते पैसे त्यावेळेच्या किमतीने वापस मिळतील. त्यामुळे आज भारतात असणार्‍या व इतर देशात सेटल होऊ पाहणार्‍या लोकांना पण असे अकाउंट चांगलेच ठरेल.

२.भारतात बॅंकेत न जाता, ऑन्लाईन अकाउंट उघडता येईल का?
हो. जर SBI, ICICI अश्या प्रोव्हाईडर्सकडे ट्रेडिंग अकाउंट असेल तर न जाता ही उघडता येईल.

३. दर महिन्याचे पैसे पण असेच ऑनलाईन भरता येतील का?

हो. दर महिन्यात कोणत्या तारखेला हे पैसे कोठून भरायचे (आपोआप) हे निवडता येते.

४. दर महिन्याचे पैसे टाकायचे अप्पर लिमिट काय आहे?
अप्पर लिमिट नाही. मिनिमम ५०० टियर १ आणि १०००, टियर २.

५. काही कारणाने टियर १ ते २ किंवा २ ते १ अशी ट्रान्सफर केलेली चालते का?
बहुदा चालते. नक्की वाचून सांगतो, शिवाय आज जर SBI फंड निवडला असेल आणि उद्या वाटले की ICICI निवडावा तर तसेही चालते.

६. अकाउंट होल्डरचा मृत्यु झाल्यास हि सगळी रक्कम नॉमिनीला मिळते का?
हो. नॉमिनेशन करावे लागते.

७. दरमहिन्याऐवजी वर्षअखेर एकदम पैसे भरता येतील का ?
बहुदा नाही, पण वाचून सांगतो.

८. -टॅक्स भरायचे आहेत का पोस्ट-टॅक्स
सध्यातरी पोस्ट आहे, पण येत्या काही वर्षात नक्कीच त्यावर डिडक्शन मिळेल.

आणखी असतील तर विचारा, माहिती असेल तर नक्कीच उत्तर देईन. Happy

धन्यवाद केदार. हि अप्लाय करायची प्रोसेस आतापासुनच सुरु करायची आहे. माझी बरी मोठी प्रोसेस होणारे पॅन कार्ड च्या ड्युप्लिकेट साठी अ‍ॅड्रेस प्रुफ गोळा करण्यापासुन.... पण असो. करायलाच पाहीजे.
NRI म्हणजे मी विचारताना सध्याचं स्टेटस हे पण कधीतरी भारतात जायचं हाच विचार होता.

करायलाच पाहीजे. >> हो. पॅन कार्ड आवश्यक आहे. पॅन ऑनलाईन पण करता येते. साईट शोधावी लागेल. भारत भेटीत अकौंट उघड. आणि कायमची नाही गेलीस तरी NRI स्टेटस मुळे पैसे काढता येतील.

आत्ताच पोस्टाच्या माझ्या एजंट बाईना ह्या योजनेबद्दल विचारले तर त्यांना पत्ताच नाहीये. आता हे वाचायला देते त्यांना. चांगली वाटतेय योजना. धन्यवाद केदार.

पोस्टात सुरु करता येते का ही योजना?

पोस्टात सुरु करता येते का ही योजना? >> PFRDA प्रमाणे करता यायला पाहिजे. पण मी असे म्हणेन की तू बँकेत जाऊन काढ कारण मग अ‍ॅटो डिपॉझिट करता येईल. शिवाय कुठल्याही बँकेत अकाउंट असले तरी कोणताही फंड घेता येतो. (उदा आयसिआयसिआय मध्ये अकाउंट असतानाही स्टेट बँकेचा रिटायरमेंट फंड घेता येईल)

ह्या योजने अंतर्गत फक्त नोकरदारच पैसे गुंतवू शकतात की ग्रुहीणींनाही ही सोय आहे?
ह्यातील रकमेवर टॅक्स बेनिफिट मिळतो का?
अश्या योजनेत रिस्क किती?
मला अर्थकारणातील ओ की ठो कळत नसल्याने मी हे प्रश्न विचारले आहेत क्रुपया मार्गदर्शन करावे.

छान माहिती केदार... Happy
मलाही गुंतवणूकीविषयी फारस काही कळत नाही...
माझ्याही प्रश्नांची उत्तरे द्याल का..
१. <<टियर २ ही योजना कधीही बंद करता येते व पैसे उचलता येतात.>> म्हणजे मी जर या एप्रिल मध्ये टियर २ मध्ये जर दर महिना १०००/- रुपये टाकले आणि एका वर्षाने खाते बंद करून पैसे मिळतील का? यात नफा तोटा किती ? कि अमूक ईतकी वर्षे झालीच पाहिजे असे आहे का..?
२. अकाउंट ओपन करायला वयाच बंधन आहे का? म्हणजे पेंशन योजना आहे म्हणून विचारल..
३. ट्रेडिंग अकाउंट असणे गरजेचे आहे..?
४. आणखीन काय काय डॉक्युमेंट आवश्यक आहेत या योजनेसाठी..?

अरे वा केदार, उत्तम माहिती. जरा कोणता फंड मॅनेजर चांगला असेल तेही सांगाल का? किंवा त्यांचे रेकॉर्ड कुठे व कसे चेक करयचे ते सांगा.

केदार मस्त माहिती. मी उघडणारच आहे. मुलांच्यानावे पण ते १८ वयाचे झाल्यावर उघडावे. त्यांना चांगले धन मिळेल. ह्या योजनेत जितके लवकर सुरू करू तितके चांगले.

केदार,
अगदी छान माहिती. पण काही प्रश्न :
१) ६० वर्षानंतर दर महा जी पेन्शन मिळेल ती किती असेल ?
२) R.D. पेक्षा यात नक्की काय वेगळे आहे?(मला अगदीच काही कळत नाही यातल म्हणून विचारल)
३) रिस्क फॅक्टर्स कोण्ते ?
४) बाकी च्या Pvt. पेन्शन पेक्शा यात जास्त सुरक्षितता आहे का ?

सरकारी कर्मचार्‍यांसाठी ही पूर्वीच्या पेन्शन योजनेला पर्यायी आहे कीं जोड योजना आहे? कारण पूर्वी सरकारी कर्मचार्‍यांचे पेन्शन हा राज्यघटनेनुसार " चार्जड" खर्च असे [ लोकसभा किंवा विधानसभा यांच्या मंजूरीची आवश्यकता नसणारा खर्च] व त्याला <<तर पूर्वी पेन्शन मधील रक्कम ही PF अकाउंट मधेच असायची आणि PF मॅनेजर्स ह्या बॅंकाच असल्यामुळे त्यावर साधारण दराने व्याज मिळायचे.>>हे लागू होत नसे [ कारण पेन्शन "कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया" मधून दिले जाई ] . मध्यंतरी जर यात कांही बदल झाला असेल तर मात्र मला माहित नाही. इतरांसाठी मात्र ही योजना सकृतदर्शनी तरी आकर्षक वाटते.

कारण पेन्शन "कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया" मधून दिले जाई >> हो. मला हे म्हणायचे होते की बँकाच ह्या अकाउंट पेन्शन लॉ अंतर्गत चालवायच्या व परतावा खूप असा मिळत नसे पण ह्या योजने अंतर्गत शेअर बाजाराचे फायदे (व तोटे) हे पेन्शन धारकाला मिळतील.

मध्यंतरी जर यात कांही बदल झाला असेल तर मात्र मला माहित नाही >> नाही तेच सर्व आहे.

१ ६० वर्षानंतर दर महा जी पेन्शन मिळेल ती किती असेल ?
ह्याचे उत्तर आपण दरमहा किती गुंतवू ह्यावर अवलंबून आहे.

२) R.D. पेक्षा यात नक्की काय वेगळे आहे?
R.D. मध्ये त्याच दराने व्याज मिळते. पण इथे मिळणारा परतावा हा शेअर बाजारावर अवलंबून आहे. थोडक्यात तुमच्या पैशाने फंड मॅनेजर्स हे समभाग विकत घेणार.

३) रिस्क फॅक्टर्स कोण्ते ?

जे जे फॅक्टर्स शेअर बाजारातील गुंतवणूकीकरता लागू होतात ते सर्व. इथे आपण पॅसीव्ह गुंतवणूकदार असतो हाच काय तो फरक.

४) बाकी च्या Pvt. पेन्शन पेक्शा यात जास्त सुरक्षितता आहे का ?

तुलना नाही केली. म्हणून नक्की असे काही सांगता येणार नाही, पण खूप कालावधी करता जर गुंतवणूक असेल तर मार्केट रेट नेहमी ५ ते ६ टक्के धरून टारगेट काढावे.

५. <<टियर २ ही योजना कधीही बंद करता येते व पैसे उचलता येतात.>> म्हणजे मी जर या एप्रिल मध्ये टियर २ मध्ये जर दर महिना १०००/- रुपये टाकले आणि एका वर्षाने खाते बंद करून पैसे मिळतील का? यात नफा तोटा किती ? कि अमूक ईतकी वर्षे झालीच पाहिजे असे आहे का..?

नफा तोटा हा बाजारावर अवलंबून आहे, तुम्हाला फक्त काढण्याची फिस (बहुदा २०० रू वगैरे ) द्यावी लागेल. टियर २ ला अमुक वर्षे असे काही नाही. टियर १ ला मात्र वयाची ६०.

६. अकाउंट ओपन करायला वयाच बंधन आहे का? म्हणजे पेंशन योजना आहे म्हणून विचारल.. >> नाही. कोणीही वयाचे बंधन पार केलेला (मायनर नसणारा) व्यक्ती उघडू शकतो. पण जास्तीत जास्त वय ५५ एवढेच आहे. ( १८ ते ५५)

७. ट्रेडिंग अकाउंट असणे गरजेचे आहे..?
नाही. बँकेत जाऊन काढता येईल.

८. आणखीन काय काय डॉक्युमेंट आवश्यक आहेत या योजनेसाठी..?
जे अकाउंट लागतात ते स्रर्व म्हणजे पॅन कार्ड, फोटो, अ‍ॅड्रेस प्रुफ इ इ

९/ ह्या योजने अंतर्गत फक्त नोकरदारच पैसे गुंतवू शकतात की ग्रुहीणींनाही ही सोय आहे?
कोणीही काढू शकते बहुदा. पण वाचून परत लिहितो.

१० ह्यातील रकमेवर टॅक्स बेनिफिट मिळतो का?
हो. ८० सी योजने अंतर्गत ही रक्कम टॅ़क्स मधून कापता येते.

ह्यातील रकमेवर टॅक्स बेनिफिट मिळतो का? >>>> ICICIdirect वरुन मिळालेली माहिती

Some highlights of NPS:

Scheme designed by PFRDA
Option to select from 6 of the top Fund Management Houses
Low fund management charges of less that 0.01%
Flexibility to withdraw 60% of funds on reaching the age of 60
Flexibility to withdraw in lump sum or in trenches of minimum of 10% each and buy
annuities of the remaining 40% and be set for life
For special requirements a one time withdrawal or liquidity of 20% of corpus is
allowed before maturity
Contributions to NPS are exempt under Sec 80C

Contributions to NPS are exempt under Sec 80C >>> Happy हो ह्यावर टॅक्स बेनिफीट आहे. धन्यवाद श्री. मी मागचे ही पोस्ट एडीट करतो.

इथले पोस्ट हे ओळख करून देण्याच्या दृष्टिकोणातून लिहले आहे योग्य माहिती साठी बँकेत जाउन चौकशी करणे योग्य राहिल कारण बरेचदा एखादी चांगली / वाईट गोष्ट माझ्या नजरेतून सुटू शकते. अर्थात प्राथमिक चौकशी साठी हा फोरम योग्यच ठरेल. Happy

PPF मधे ठराविक दराने व्याज मिळते (सध्या ८% दर आहे). हा पर्याय सुरक्षीत आहे पण व्याजाचा दर पण कमी आहे. केदारने सांगितल्याप्रमाणे NPS पैसा mutual funds मध्ये गुंतवते. त्यामुळे त्यात जोखिम आहे. पण more returns need more risks. म्हणून जास्त परतावा हवा असेल तर ही जोखीम घ्यावी लागेल.

NPS पैसा mutual funds मध्ये गुंतवते

हे तुमच्या निवडीवर आहे. वेगवेगळे प्लान्स उपलब्ध आहेत. फक्त जी-सेक (सरकारी रोखे), किंवा फक्त डेब्ट , काही भाग इक्विटीत करणारे इ.
पेन्शन फंडची गुंतवणूक अत्यंत दीर्घकालीन असेल आणि अशा काळात इक्विटी कधीही अन्य पर्यायांपेक्षा जास्त रिटर्न्स देतात.
फक्त व्याजाने पैसे गुंतवले तर इन्फ्लेशन बघता नेट रिटर्न निगेटिव्ह यायचे!

केदार, मला अशी माहिती मिळाली की, ही योजना येऊनही तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही कारण बेसिकली पैसे कोठे गुंतवायचे वगैरे काहीच व्यवस्थित असे ठरले नव्हते. फंड मॅनेजमेंट नावाचा प्रकारच अस्तित्वात नव्हता - बराच गोंधळ वगैरे. हे खरं आहे का? तुला काही ठाऊक आहे का ह्याबद्दल? आणि हे खरं असेल तर अजूनही तशीच परिस्थिती आहे का?

मी a/c काढले आहे.
१. वर्षातुन ४ वेळा Txn करावे लागतात.
२. कमीत कमी ६०००/- p.a. भरावे लागतात.
३. प्रत्येक वेळी २०/- Txn fee घेतात.
४. CAMS online आता ecs ची सुविधा चालु करनार आहे.
५. टियर २ ते टियर १ ट्रान्स्फर चालते पण टियर १ ते टियर २ नाही चालत.
६. Govt. Bonds, Debt funds & Equity यान्चे योग्य प्रमान द्यायची सुविधा आहे. त्याचा योग्य वपर केल्यास चान्गला परतावा मिळु शकेल.
७. येत्या ३ वर्शात १२०००/- रु पेक्शा कमी रक्कम भरनार्यान्ना सरकार १०००/- रु देनार आहे.

Pages