कवडसा

सारेच आहे शांत

Submitted by _तृप्ती_ on 20 October, 2019 - 01:58

सारेच आहे शांत, आणि दिसे सुंदर
काचेतल्या घराचे, पडसाद जाती न दूर
रंगात रंगलेले, सारेच रंगीन चेहरे
मुखवटे हसरे असे कि, झाकावे दुःख गहिरे
सारीच सुंदर फुले, फुलदाणीत विसावलेली
झाडाची टवटवी मात्र दाराआडून रुसलेली
आवाज नाही इथे, विसंवाद नाही कुठे
वाचाच नसलेले, बोलके पुतळे सुरेख
येईल एक कवडसा, हे स्वप्न पहावे का
अद्याप वाजले ना पाऊलही उन्हाचे
दरवळेल रातराणी अन मोहरेल काया
उरात भरुनी पुन्हा येईल का रे माया

शब्दखुणा: 

प्रतिक्षा

Submitted by निर्मला on 18 September, 2010 - 03:57

जपून जाताना हळूच
निसटला उगाच
हलकासा कवडसा एक

दीस मावळत आला
तरी मन व्यस्त
प्रतिक्षेत उन्हाच्या

येवू देना झुळूक
एकतरी गार् गार
जाणीवेस भ्रम
होवू देना आता
टीमटीमत्या दवाचा

स्वप्ने गेली निजायला
तरी मन व्यस्त
प्रतिक्षेत निशेच्या

मिटू देना क्षणेक
सरताना झरझर
आसवाना भ्रम
होवू देना आता
थिजथिजल्या सुखाचा

सारी स्तब्ध गाणी
एकली पोरकी
तरी व्यस्त धून
प्रतिक्षेत सुराच्या

एक तरी सुर
भिडू देना काळ्जाला
वाहू देना भळभळा
वेदनेला मुक्त जरा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कवडसा