सारेच आहे शांत

Submitted by _तृप्ती_ on 20 October, 2019 - 01:58

सारेच आहे शांत, आणि दिसे सुंदर
काचेतल्या घराचे, पडसाद जाती न दूर
रंगात रंगलेले, सारेच रंगीन चेहरे
मुखवटे हसरे असे कि, झाकावे दुःख गहिरे
सारीच सुंदर फुले, फुलदाणीत विसावलेली
झाडाची टवटवी मात्र दाराआडून रुसलेली
आवाज नाही इथे, विसंवाद नाही कुठे
वाचाच नसलेले, बोलके पुतळे सुरेख
येईल एक कवडसा, हे स्वप्न पहावे का
अद्याप वाजले ना पाऊलही उन्हाचे
दरवळेल रातराणी अन मोहरेल काया
उरात भरुनी पुन्हा येईल का रे माया

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

येईल एक कवडसा, हे स्वप्न पहावे का
अद्याप वाजले ना पाऊलही उन्हाचे

वा, एकदम मस्त

+१
>>>>>>>>> येईल एक कवडसा, हे स्वप्न पहावे का
अद्याप वाजले ना पाऊलही उन्हाचे>>>>>>>>> सुरेख!!