शपथ

तुम्ही पहिल्यांदा कधी घेतली?

Submitted by मानव पृथ्वीकर on 28 June, 2018 - 13:07

अनेक लोक दारु पितात, सोडण्याचा संकल्प करतात, काही सोडतात तर काही सुरु ठेवतात. तर काही लोक दारु न पिताच ती न घेण्याचा संकल्प करतात.
तर तुम्ही दारुला हातही लावणार नाही अशी शपथ पहिल्यांदा केव्हा घेतली?
ती तडीस नेली की नाही? नसल्यास का नाही?

(हात लावतच नाही सरळ ओठाने स्पर्थ करुन पितो/पिते, असल्या कोमेन्ट्स टाळता आल्यास उत्तम, आल्यासही हरकत नाही.)

विषय: 

शपथ.....

Submitted by माणक्या on 16 September, 2010 - 01:42

मावळतीची निरोपाची किरणं
क्षणभर विश्रांतीसाठी विसावली पानाफुलांवर
जणू सांगत होती सगळ्यांना
प्रकाश देत नसू आम्ही पण रात्रभर जगण्याची उब नक्कीच देतो
अन फुलही त्या उबदार सहवासात
डोलून थकलेली दिवसा होती तिन्हीसांजेचा नखरा पाहत
कळ्यांचं कुजबुजणं वाढलं होतं एव्हाना
खट्याळ डोळ्यांनी एकमेकीकडे पाहत मंद हसत होत्या त्या
पक्षी रमले होते एकमेकांना निरोप देण्यात
अन दिसत होती घरट्याची ओढ अधीर पंखांच्या हालचालीत
चांदण्याची चालली होती लगबग शृंगाराची
चांदवाही नादमय संथ लयीत सरकत होता स्वतःच्याच नादात
रातराणी साज सावरत गंधाळली अलवार
मोगऱ्याची नशा भिनू लागली भोवतालच्या वातावरणात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शपथ