तुम्ही पहिल्यांदा कधी घेतली?

Submitted by मानव पृथ्वीकर on 28 June, 2018 - 13:07

अनेक लोक दारु पितात, सोडण्याचा संकल्प करतात, काही सोडतात तर काही सुरु ठेवतात. तर काही लोक दारु न पिताच ती न घेण्याचा संकल्प करतात.
तर तुम्ही दारुला हातही लावणार नाही अशी शपथ पहिल्यांदा केव्हा घेतली?
ती तडीस नेली की नाही? नसल्यास का नाही?

(हात लावतच नाही सरळ ओठाने स्पर्थ करुन पितो/पिते, असल्या कोमेन्ट्स टाळता आल्यास उत्तम, आल्यासही हरकत नाही.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे एक नात्यातले, काका म्हणूया.. या दारूच्या व्यसनापायी घरसंसार उद्ध्वस्त झालेले पाहिले आहे.
त्यामुळे लहानपणीच मी आणि त्यांच्या मुलाने, आम्ही दोन्ही भावांनी काकींच्या गळ्याला हात लावत शपथ घेतली की दारूच्या नादाला कधी लागणार नाही...

मी आजही ती शपथ पाळतोय...
पण तो काकांचा मुलगा मात्र झुलतराव झालाय Sad

त्यामुळे मनाशी एक खूनगाठ बांधली. घरची वाताहात आणि आईचे खडतर आयुष्य बघूनही त्या मुलाला अक्कल आली नाही आणि दारूच्या नादी लागला.. तर अश्या या वाह्यात पेयापासून जास्तीत जास्त लोकांना लांब ठेवायचा प्रयत्न करायचा.

मी विषयावर लिहितोय
आपण अवांतर लिहित आहात
त्यामुळे काही लिहिलेच पाहिजे का हे मी आपल्याला बोलायला हवे ना Happy

असो, सक्ती नाहीये. पण माझ्या आवडीच्या विषयावरचा धागा निघाला तर मी त्यात लिहीणार हे ईतके सिंपल आहे.

धागा दारूविरोधात आहे हे समजूनही आपण प्रतिसाद वाचत आहात आणि त्यात दारूविरोधी लिहिलेले नसेल अशी अपेक्षा ठेवत आहात हे गंमतीशीर आहे Happy