पेहला नशा..

पेहला नशा..

Submitted by पाचपाटील on 13 June, 2020 - 12:03

पेहला नशा..

तुम्ही जर नीट तयार असाल, तर ह्याचा नुसता सुरूवातीचा ट्रॅकसुद्धा हेडफोन्समधून तुमच्या आत आत जाऊन,
तुमच्या मेंदूतली सगळी धूळभरली रंध्रं मोकळी करायला लागतो..

ग्गोड ग्गोड झिणझिण्यांची कारंजी उसळवू शकतो..

कुठंही आणि कसंही असलात तरी 'ह्या सगळ्याकडं'
बघण्याची एक फ्रेश नजर पुन्हा एकदा मिळवून देऊ शकतो..

प्रेमात तरंगणार्‍यांसाठी तर आहेच हे, अर्थातच..
पण त्यांचा काई विषय नाई..
त्यांचं ते बघून घेतील..
आपल्याला काय करायचंय..!

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पेहला नशा..