पेहला नशा..
तुम्ही जर नीट तयार असाल, तर ह्याचा नुसता सुरूवातीचा ट्रॅकसुद्धा हेडफोन्समधून तुमच्या आत आत जाऊन,
तुमच्या मेंदूतली सगळी धूळभरली रंध्रं मोकळी करायला लागतो..
ग्गोड ग्गोड झिणझिण्यांची कारंजी उसळवू शकतो..
कुठंही आणि कसंही असलात तरी 'ह्या सगळ्याकडं'
बघण्याची एक फ्रेश नजर पुन्हा एकदा मिळवून देऊ शकतो..
प्रेमात तरंगणार्यांसाठी तर आहेच हे, अर्थातच..
पण त्यांचा काई विषय नाई..
त्यांचं ते बघून घेतील..
आपल्याला काय करायचंय..!
पण,
''आमचं काय राहिलंय आता!!''
असं ढेरी खाजवत विचारणार्या किंवा रामरगाड्यात टणक होऊन गेलेल्या लोकांचा, कुठलातरी प्राचीन नॉस्टाल्जिया कुरवाळण्यासाठीसुद्धा आहे हे..
आणि,
''लाख इच्छा आहे ओ...पण काय होतंच नाय..!
ते गिटार वाजवत येतात आणि आमच्यासाठी काहीही
शिल्लक ठेवत नाहीत'',
अशा आत्मकरूणेनं ग्रासलेल्यांसाठी,
''होईल रेss तुझंही काहीतरी चांगलं होईल..'',
असा सर्वकाळ दिलासा मिळवून देण्याचीसुद्धा ह्यात ताकद आहे..!
(पुरे झालं.. एवढंच ठिकाय...उगाच पाणी घालून घालून
वाढवू नकोस आता, त्या अमक्या-तमक्यासारखं)
माझ आवडत गाणं!
माझ आवडत गाणं!
तुमच्या लेखातले छोटे छोटे पंचेसच लेखात जान आणतात.. भारी लिहिलय! आवडलं.
(No subject)