रमण

ज्ञानाभिलाषा ( आज रमण महर्षि जन्म दिवस त्यांना हि कविता समर्पित )

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 December, 2019 - 12:10

**********
वाहतो हे शब्द
अक्षरांची पोथी
नाही तया गाठी
अनुभव ॥
कुणी कुणी येते
ऐकविते ज्ञान
कंटाळून कान
गेले तया ॥
जाणत्या जवळी
सदा उभे मौन
वायफळ प्रश्न
निरर्थक ॥
शास्त्राचा धांडोळा
बुद्धीचा पाचोळा
अवघा घोटाळा
गमतसे ॥
जाणत्या जवळी
जाणण्यास जाता
जाणण्याची वार्ता
बुडो जाते ॥
जयाचे वरण
करीतसे आत्मा
तया अपघाता
नाव ज्ञान ॥
बाकी कसरत
श्वासांची शब्दांची
चाले जगताची
मुक्तीसाठी ॥
विक्रांत निमूट
पाहुनिया गती

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रमण